म्हसळा जंगमवाडी शिवमंदिर जीर्णोद्धार औचित्याने ग्रामस्थांची पंगत आणि संत महात्म्यांची संगत लाभली हे परम भाग्याचे - खासदार सुनिल तटकरे





● पशु, पक्षी, प्राण्यांबद्दलची आत्मियता लिहिता, वाचता आली पाहिजे - डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज

म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील एकमेव मोठया लोकवस्तीच्या वीरशैव लिंगायत जंगम समाजाचे तोंडसुरे - जंगमवाडी गावात प्राचीन मन्मेश्वर शिव मंदिराचा जीर्णोद्धार व नुतन मंदिर लोकार्पण सोहळा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी स्वागत समारंभात मनोगत व्यक्त करताना मंदिरात प्रवेश करताना ग्रामस्थांची पंगत आणि संत महात्म्य श्री गुरू ष.ब्र.प.108 डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, राय पाटणकर महाराज यांची संगत लाभली हे आमचे परमभाग्यच आहे असे सांगून महाराजांच्या मंगलाशीर्वादाने त्यांचे सानिध्यात समाजभूषण सुरेशस्वामी जंगम यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे साकार झालेल्या शिव मंदिराचा नववर्षाच्या सुरवातीला लोकार्पण करण्याचा योग लाभल्याचा आंनद व्यक्त केला. 
या वेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत जेष्ठ नेते अलिशेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,तीनवाडी गावाध्यक्ष अनंत नाक्ती,अध्यक्ष मलिकांत जंगम,उपाध्यक्ष सुधाकर जंगम,मनोहर जंगम,संजय जंगम,अनिल जंगम,गजानन जंगम,अनंत जंगम,प्रतीक जंगम आदि मान्यवर,युवक,ग्रामस्थ महिला मंडळी उपस्थित होते.
  खासदार सुनिल तटकरे यांनी ग्रामस्थांच्या एकतेची स्तुती करताना जंगमवाडीतील ग्रामस्थांच्या मनात दैवी भावना निर्माण झाली आणि ज्या पद्धतीने ज्या विचारांनी मंदिराची उभारणी केली आहे त्याचे शब्दांत मोल करता येणार नाही.अशा प्रकारे मंदिर उभारणी करण्यासाठी ग्रामस्थांना जो माणस आला ते काम केवळ वर्गणी गोळा करून होत नाही किंवा ते एकदुकट्याचे काम नसुन ते गावाचे एकतेचे प्रतिक असल्याचे सांगितले. या कामात गावातील महिला भगिनी,नवतरुण मंडळी,मुंबईकर मंडळी या सर्वांच्या घामाचे प्रतिक असल्याचे गौरवोद्गार खासदार सुनिल तटकरे यांनी काढतानाच त्यात अधिक भर पडली ती डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आणि नववर्षाच्या सुरुवातीला आज खऱ्या अर्थाने हे शिव मंदिर मुहूर्तरूपात आले. नव्या वर्षाची सुरुवात आणि शिव मंदिराचे उदघाटन करण्याची संधी गुरुवर्यांच्या सहवासात लाभली याचा मनस्वी आंनद व्यक्त केला. 20 आणि 21 व्या शतकात कोरोनाच्या कठीण काळात आपण आपल्या मधुन खुप माणस गमावली याचे शल्य आणि दुःख आहेच याच वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी अध्यात्मिक आणि परखड विचार मांडत असताना दैनिकांमध्ये आलेली शतक माणसाच्या मनात वेगळे विचार बिंबवले जातात आणि गावच गावपण हरवल जात. फेसबुक, इंटरनेटच्या जमान्यात जन्माला आलेली पिढी  चांगल्या विचारा पासुन दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा वेळेला सदगुरूंच मार्गदर्शन समाजाला मिळत असत. समाजाला ते उद्बोधक पध्दतीच ठरतं त्यातुन प्रेरणा मिळते प्रत्येकाच्या मनात असलेली चलबिचल थांबते,विचारांचे बळ वाढत आणि स्थिरता निर्माण होते ते काम आध्यात्मिक गुरू महाराज करत आहेत.वीरशैव लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रबोधनाचे अबोध असे कार्य करतात तसे धारेश्वर स्वामी महाराज पाटण सारख्या परिसरात तर दुसरे रायपाटणकर महाराज राजापूरच्या परिसरात समाज प्रबोधनाचे अबोध कार्य करीत असल्याने तुम्हाला आम्हाला प्रबोधीत करणारी संत मंडळी नेहमी प्रेरणा देते गावचे हित जपण्याची आत्मिकता मिळत असते याचे समाधान व्यक्त केले.हे शिव मंदिर आत्मिकता जोपासना करणारे दैवत आहे येथे आल्यावर स्वामींच्या हातून साखर प्रसादाचा लाभ मिळाला हे भाग्य आणि आंनद देणाऱ्या सेवा कामा पेक्षा अधिक असल्याचे सांगितले. मी कधी कोणत्याही गावात आलो तरी खाली हात येत नाही.तालुक्यातील प्रत्येक गावात काही ना काही तरी विकास झालेला दिसतो.जंगमवाडीत आम्हाला डोंगरी विकास योजनेतून काही प्रमाणात विकास निधी देता आला पण आज नीलकंठ स्वामी धारेश्वर महाराज यांनी मंदिरा समोर असलेली मोकळी जागा विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे त्याचे बांधकामास याच वर्षी निधीची तरतूद करण्यात येईल असे आश्वाशीत केले.या भागाचा विकास करण्यासाठी एक तप अर्थात 12  वर्षाचा कालावधी लागला असल्याचे आवर्जुन सांगताना समाजाची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करण्याची शक्ती मिळो.संकल्पाचे रूपांतर सिद्धित जावो अशी इच्छा व्यक्त करून हे वर्ष कोरोना मुक्त,भय मुक्त आणि सर्वांना आरोग्यदायी लाभो अशी प्रार्थना केली.श्री स्वामी धारेश्वर महाराज यांनी आध्यात्मिक आणि सर्वधर्म समभावाने देशहित जोपासना करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन करताना तोंडसुरे गाव हे ग्रंथांचे गाव झाले पाहिजे खासदार सुनिल तटकरे यांनी हे गाव ग्रंथाचे गाव करावे असे सुचित केले.प्रत्येकाने सर्वधर्मीय, सत्संग, गुरू, आध्यत्मिक,कादंबरी सर्वच प्रकारची ग्रंथ वाचली पाहिजेत. पशु,पक्षी,प्राण्यांबद्धलची आत्मियता लिहिता,वाचता आली पाहिजे. सर्वांनी वाचते झाले पाहिजे.सातारा जिल्हा ग्रंथांचा गाव झाला आहे.राष्ट्रवादीचे दिवंगत नेते पाटणकर दादा यांनी ग्रंथांचे गाव केले आहे. तोंडसुरे येथूनच श्रीवर्धन,हरिहरेश्वर,दिवेआगर येथे जाताना पर्यटकांनी ग्रंथाच्या गावाला भेट देऊन जावे अशी इच्छा व्यक्त केली.पश्चिम महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम असला तरी तेथील तरुण आळशी बनत चालला आहे याची खंत व्यक्त करताना येथील तरुणांमध्ये प्रेरणा आहे काम करण्याची शक्ती आणि भक्ती दिसत आहे.तशा प्रकारचे छोटे मोठे उपाय योजना या विभागात व्हायला पाहिजेत.पावसाळ्यात या विभागात मुबलक प्रमाणात पाऊस पडतो पण मार्च,एप्रिल महिन्यात पाणी-पाणी करावा लागतो त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी आहे.कोल्हापूर मध्ये सर्वधर्म समभावाची प्रार्थनेचा वारसा लाभला आहे.शाळा,कॉलेज,शासकीय कार्यालयात रोज सकाळी 11 वाजता नित्य नेमाने ती घेतली जाते तिला कोल्हापूर टाइप (केटी)असा उल्लेख होतो तशी प्रार्थना संपुर्ण देशात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना सुनिल तटकरे यांनी सर्व धर्म समभाव नांदत असलेल्या कोकणात ती सुरू करावी आणि त्या प्रार्थनेची ओळख एसटी या नावाने व्हावी असे सांगितले.लोक वर्षभरात दिवाळी, होळी,गणपती उत्सव जसे साजरे करतात तसे सर्वांनीच राष्ट्रीय साजरे होत असलेले तीन सण 15 ऑगस्ट,26 जानेवारी आणि 1 मे या उत्सवात सहभागी झाले पाहिजे असे निक्षून सांगितले. कोरोना मुक्ती करिता शासन देत असलेली मोफत लस सर्वांनी घेतली पाहिजे.भेदभाव,अहंभाव सोडला पाहिजे शेवटी सोडुन जाताना मी,माझा न म्हणता मी माणुस आहे हे सांगावं लागणार आहे असे मार्मिकपणे उदाहरणे देवुन  सांगितले.शेवट गोड करताना राजदंड आणि धर्मध्वज एकत्र आल्या शिवाय ध्वज फडकत नाही तसेच आपणास आनंदी राहायचे असेल तर मन शुद्ध राहिले पाहिजे आणि जगाला शांत राहायचे असेल तर क्षमाशांती नांदवावी लागेल त्यातच देशाची आणि जगाची उन्नती होणार असल्याचे महाराजांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा