श्रीवर्धनमध्ये एसटी कर्मचार्‍यांचे भीक मागो आंदोलन

श्रीवर्धन प्रतिनिधी
राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. अद्यापदेखील एसटीच्या विलीनीकरण मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असून, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचारी रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे. श्रीवर्धन शहरातील मुख्य बाजारपेठेत एसटी कर्मचार्‍यांनी झोळी घेऊन भीक मागत सरकारचा निषेध व्यक्त केला. एसटी स्टँड ते बाजारपेठ अशी भीक मागो रॅली काढण्यात आली होती. यावेळी एसटी कर्मचार्‍यांचे सरकारमध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे व भीक मागण्याची वेळ थांबलीच पाहिजे, अशा घोषणा देत संपूर्ण बाजारपेठेत भीक मागून आंदोलन करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा