● नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा-मुख्याधिकारी मनोज उकिर्डे
म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
श्रीवर्धन म्हसळा लोणेरे राज्यमार्ग 99 वरील म्हसळा शहरातील रस्त्यावर साखळी क्रमांक 17/700 (पाभरे फाटा ) येथील लेहन ओहळाचे पुल कमकुवत झाला आहे तो पुल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुलाच्या बांधकामासाठी या पुलावरून म्हसळा शहराला पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी दिनांक 24 ते 26 जानेवारी 2022 रोजी तीन दिवसांसाठी शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन यांनी म्हसळा नगर पंचयतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांना लेखी पत्र देवुन कळविले आहे. म्हसळा शहरातील नागरिकांनी येत्या दिवसात पाण्याचा पुरेसा साठा करून पाण्याची बचत करण्याचे आवाहन म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले. तशा प्रकारे शहरात दवंडी देवुन कळविले जाणार आहे. सार्वजनिक कामी शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी केले आहे.
Post a Comment