टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली जिल्हा परिषद गट व बागमांडला गट नाराज शिवसैनिकांनी आमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये यावे, तालुक्यातील सर्व गाावांचा विकास आपण हमखास करु असे आवाहन या मतदारसंघाचे प्रमुख श्री कृष्णा कोबनाक यांनी केले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली व बागमांडला गटात महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही विकास कामांना विकास निधी दिला नाही म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक प्रचंड नाराज असल्याच्या बातम्या विविध वृतपत्र व सोशल मिडिया मध्ये झळकत आहेत या बाबतीत भाजप नेते श्री कृष्णा कोबनाक यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की विकास बाबतीत श्रीवर्धन मतदारसंघात सर्वच पक्षातील नेतृत्व दुर्लक्ष करीत आहेत यावर आपण चर्चा करुन परिवर्तन घडवू या व नव्याने रचना करुन या मतदारसंघात बदल घडवू या असे आवाहन बाग मांडला दिघी, गणातील सर्व, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांना केले आहे. सर्वानी चर्चा करण्यासाठी तयार रहावे असे आवाहन त्यानी पत्रकाद्वारे केले आहे.
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळ मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाना सुरवात झाली अनेक रस्ते मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू झाले, राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी योजना सुरू झाल्या, केंद्र सरकारच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक योजनेतून गावा गावात विकास होत आहे. माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग देखील श्री नितीन गडकरी साहेबांनी जलदगती ने सुरू केले व काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्रात सरकार आहे व राज्यात विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार आले आहे ते जास्त काळ टिकणार नाही म्हणून शिवसैनिकांनी योग्य विचार करुन आमच्या समवेत यावे असे आवाहन केले आहे.
Post a Comment