"माझे कुटुंब,माझी जबाबदारी" मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करा.



म्हसळयात व जिल्ह्यांत कोरोना रूग्ण वाढत आहेत.

म्हसळा :  संजय खांबेटे 
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.दिवसें दिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात दि. ९जानेवारी २०२२ च्या कोविड अहवालानुसार या एकाच दिवशी तब्बल १हजार ८५१ नव्याने  करोना रुग्णांची नोंद झाली आहे. बरे झालेले २९६, मृत १ आहे, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण ८०३९ आहेत तर जिल्ह्यात कोरोना मुळे मृतांची एकूण संख्या ४ हजार ५९३ झाली आहे.

  म्हसळा तालुक्यात आज कोरोनाने नव्याने २ रुग्ण बाधीत झाले आहेत. तालुक्यात म्हसळा ३, काळसुरी २, सोन घर, खामगाव, चिखलप, खरसई, वारळ येथील प्रत्येकी एक असे १० कोरोना बाधीत गृहविलगीकरणात (Home Isolatation) आहेत. आजचे  दोनही नवीन रुग्ण २७ व ४९ वयाच्या म्हसळा व खामगाव येथीलआहेत.
   जिल्ह्यांतील आज नव्याने आढळलेले तालुकानिहाय करोना पॉझीटीव्ह रुग्ण पुढील प्रमाणे अलिबाग ४१, कर्जत १७, खालापूर ४१, महाड १२, माणगाव १२,  मुरुड ४, पेण २२, रोहा ७, श्रीवर्धन ३, सुधागड २, तळा३, उरण १४ असे रुग्ण आहेत.

" म्हसळा तालुक्यात कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.कॉल सेंटरशी संपर्क साधून नागरिक कोविड-19, बेड व्यवस्थापन,ॲम्बुलन्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधा याबाबत ची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात.जे  रुग्ण गृह विलगीकरणात आहेत,त्यांच्या जवळ या कॉल सेंटरच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला जाणार आहे .माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करा.
मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे, या सूचनांचे प्रत्येक नागरिकानी पालन करावे" म्हसळा कॉल सेंटरचा फोन क्रं.०२१४९ -२३२२२४"
समीर घारे, तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, तालुका

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा