म्हसळ्यात हुडहुडी : गावोगावी पेटल्या शेकोट्या



(म्हसळा प्रतिनिधी)
उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रातही तापमानात घट झाली आहे. सध्या सर्वत्र तापमानाचा पारा घसरत असताना आज पहाटे ५ते ६ च्या दरम्यान म्हसळ्यातही १४ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आला.त्यामुळे शहरात पहाटे प्रवास करून आलेली मंडळी, माल वहातुकदार ट्रक मालक- ड्रायव्हर , हमाल रस्तालगत शेकोटया करून बसले होते. सकाळी walk ला जाणारी मंडळी , जाकीट, शाल,स्वेटर, कानटोपी, अशी थंडीला नियंत्रणात ठेवणारे कपडे परिधान करून गेले होते असे चित्र होते. थंडीमुळे पहाटे चालणाऱ्यांची संख्या आज रोडावली होती. थंडीमुळे तालुक्यातील आंबा काजू बागायतदार समाधानी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा