श्रीवर्धन :- श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथील राष्ट्रीय पेय जल अंतर्गत 70 लाख खर्चाची नवीन पुरजोडणी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण पालकमंत्री नाम .अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नाम .अदितीताई म्हणाल्या कि ,या पूर्वी 36 लाखाची पाणी योजना या गावात होती ,आता 70 लाखाची नवीन पुनर्रजोडणी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे .अपूर्ण कामांचे लोकार्पण करणे हे आम्हाला कधीच जमत नाही ,काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण करणे हाच मूळ उद्देश असतो .रानवली गावातील राहिलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करू ,ग्रामदेवतेच्या मंदिराला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या आमदार निधीतुन 5 लाख देणार असल्याचे जाहीर करून ,तालुक्यात सुसज्ज दर्जेदार सेवा देणारे पशुवैद्यकीय दवाखाना उभारणार असल्याचे सांगितले ,या वेळी व्यासपीठावर रानवली सरपंच सौ गजमल ग्रामपंचायत सदस्य सुरेश मांडवकर ,सर्व सदस्य ,तालुकाध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थतीत होते ,यावेळी रानवली येथील कोविड योद्धयांचे नाम .अदितीताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,रानवली नंतर तालुक्यातील शिरवणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे नाम अदितीताई तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले ,यावेळी स्थानिक महिला मंडळाने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता ,या कार्यक्रमात अदितीताई सहभागी झाल्या होत्या ,शिरवणे गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे नाम अदितीताईंनी आश्वासित केले ,खासदार तटकरे साहेब ,नाम .अदितीताईं व आम .अनिकेतभाईंनी विकास कामाचा धडाका लावल्याने नागरिकांत आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे
श्रीवर्धन तालुक्यात सुसज्ज दर्जेदार पशुवैद्यकीय दवाखाना निर्माण करणार - पालकमंत्री अदितीताई तटकरे
Admin Team
0
Post a Comment