तळा : किशोर पितळे
तळा नगरपंचायतनिवडणूकीच्या चार प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला असून रँलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करून अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.या ४ प्रभागात काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी मात्र प्रभाग १४ मध्ये पंचरंगी लढत होत आहे. शिवसेना × राष्ट्रवादी हि खरी लढत असुनतीन उमेदवार अपक्ष उमेदवारआपले नशीब आजमावण्यासाठी शठ्ठ ठोकून उभे आहेत. त्यामुळे या प्रभागा कडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभाग१४मध्ये रितेश मुंढे,(रवी भाऊ मुंढे भाजप प्रदेश सचिव यांचे सुपुत्र आहेत) तबस्सुम रहाटविलकर नवख्या असून लताताई मुंढे यासामाजिक कार्यकर्त्या व राजकारणी आहेत. असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवयानी मोरेउच्च शिक्षीत, पत्रकार व सासूरवाशीण आहेत. शिवसेनेचे योगेश शिर्के आहेत मागील वेळेस या भागातून काहि मतांनी पराभव झाला होता. ती भरपाई भरून काढण्यासाठी सर्व ताकदीने उतरले आहेत. सेनेने केलेला विकास व सामाजीक स्तरावर केलेला विकास तसेच १७ वार्डात केलेला विकास हा सेनेच्या विजयासाठी लाभदायक ठरणार आहे. या भागातून मागच्या वेळेस शिवसेनेने बाजी मारली होती. प्रभाग १० या ठिकाणी भाजपचे किशोर वेदक सामाजिककार्यकर्ते, विविध प्रशासनाचा गाढा अभ्यास असून विविध संस्थाचे पदाधीकारी व भाजप रायगड नमो नमो जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे मंगेश शिगवण ग्रामपंचायत पासून नगरसेवक झाले होते. शिवसेनेचे प्रवीण फोंडल संयमी, सुस्वभावी, सामाजिक कार्यकर्ते व सेनेचे निष्टावंत शिवसैनीक आहेत. शेकापच्या संस्कृती वेदक नवख्या असून आपले नशीबाची परिक्षा घेण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. हे दोन प्रभाग अधिक प्रतिष्ठेचे असून प्रभाग १मध्ये शिवसेनेच्या शुभांगी मांडवकर यांची सरळ लढत राष्ट्रवादी च्या ग्रिष्मा बामणे यांच्याशी होणार असून सेनेकडून झुकते माप घालणारअसल्याचे चित्र दिसत आहे.प्रभाग ४या ठिकाणी सेनेच्या विद्या तळेकर असून ग्रामपंचायत असताना सदस्यपद उपभोगले असल्याने अनुभव पाठीशी आहे. तर राष्ट्रवादी च्या यामिनी म्हेतर स्थानिक असून नवख्या आहेत. तर शेकाप च्या रोशनी तळेकर या देखील नवख्या आहेत.प्रचाराच्या अंतीम टप्प्यात आमदार, नामदार पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रचाराला उतरले आहेत. सत्ता मिळवण्या साठी प्रत्येक पक्षात प्रयत्नकेले जात असूनशिवसेनेची जाहीर प्रचार सभा आज होत असून तोफाची फैरी सुटणार असल्याचे पहायला मिळणार आहे. या रणधुमाळीच्या तोफा १६ ता.सांय ६ वा. थंडावणार आहेत. या प्रभागातील मतदार सुज्ञ असून जिकडे ससा तिकडे पारधीअशी वस्तूस्थिती दिसत असली तरी मतदार राजा आहे. कोणाला निवडले कोणाला डावलले हे १९ तारखेला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यासह तळावासीयांचे या चार लढती कडे लक्ष लागून राहिले आहे.
Post a Comment