देशात श्रीवर्धन प्रथम क्रमांकाचे पर्यटन स्थळ ... सुनील तटकरे





 तालुक्यात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 श्रीवर्धन हे ऐतिहासिक शहर आहे.  श्रीवर्धनचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव प्रयत्नशील आहे. देशातील पर्यटनात आपलं श्रीवर्धन शहर क्रमांक प्रथम क्रमांकाचे बनवूया असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यात विविध ठिकाणी उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले.  श्रीवर्धन नगर परिषदेची शाळा नंबर 1 मध्ये डिजिटल अभ्यासिके चे उद्घाटन करण्यात आले .  सदर प्रसंगी सुनील तटकरे यांनी उपस्थित   श्रीवर्धन मधील जनतेला संबोधित केले.  भारत देशाचा गौरवशाली प्रजासत्ताक दिन नुकताच आपण साजरा केला आहे .  देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना कर्तृत्वाला घटनाकारांनी प्राधान्य दिलेले आहे.  देशातील प्रत्येक व्यक्तीला विविध हक्क, अधिकार  आपल्या राज्यघटनेने दिलेल्या आहेत.  गौरवशाली प्रजासत्ताक दिन साजरा करून  आपण उद्याच्या सुजलाम सुफलाम देशाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत .  देशातील कष्टकरी कामगार शेतकरी नोकरदार वर्ग सर्वांच्या उद्धाराचे काम राज्यघटनेने केलेले आहे.  रायगड जिल्हा विचारवंतांचा कर्तृत्ववान व्यक्तींचा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा जिल्हा आहे.  सी.डी देशमुख यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण करून दिलेला आहे.  स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्मिती आपण करत आहोत.  डिजिटल अभ्यासिकेच्या  श्रीवर्धन मधील विद्यार्थ्यांना आपण सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत.  श्रीवर्धनमधील अभ्यासिकेतून अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याचा माझ्या हस्ते सन्मान केला जाईल.  नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास करून लेखक कवी विचारवंत उच्चपदस्थ अधिकारी निर्माण व्हावेत ही माझी मनीषा आहे. तटकरे यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय यंत्रणांना  सूचना देताना सांगितले नगरपरिषदेने डिजिटल अभ्यासिकेचे वेळापत्रक  विद्यार्थी वेळापत्रकानुसार करावे .  अभ्यासिकेचा उपयोग मच्छीमार बांधवांच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सुद्धा करावा.  आपलं श्रीवर्धन शहर अतिशय स्वच्छ शहर आहे.  आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यस्तरीय  देशपातळीवरील  स्पर्धांमध्ये श्रीवर्धन शहर अव्वल क्रमांकावर असावे.  आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी राज्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मनातील  विचारातील  विविध योजना आई आपण कृतिशीलते तून व्यक्त केले आहे. श्रीवर्धन  शहराचं रूपडं बदलण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तटकरे परिवारांनी केला आहे.  ग्रामदेवता माता सोमजाई मंदिर,  समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण,  उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा,  शिक्षण त्यासोबत सर्वच भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम आपण करत आहोत असे सुनील तटकरे यांनी सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे  यांनी आपल्या मनोगतात सांगितले की राज्यातील  सर्वात मोठी अभ्यासिका आपण श्रीवर्धन मध्ये सुरू करत आहोत  याचा मला आमदार या नात्याने आनंद आहे.  खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीवर्धन मतदार संघाचा  सर्वांगीण सबकस सर्वोत्तम विकास आपण साधत आहोत.  श्रीवर्धन मतदार संघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.  श्रीवर्धन शहर विकासाला सदैव अग्रक्रम अग्रक्रम आहे. असे आदिती तटकरे यांनी सांगितले . डिजिटल अभ्यासिका च्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी  विराज लबडे यांनी केले.  कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक,  यशवंत चौलकर, तहसीलदार सचिन गोसावी  त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा