● शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - गटशिक्षणाधिकारी राजेश कदम
म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
अखिल म्हसळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने कन्या शाळा येथे शिक्षक संघ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सुनिल पवार हे होते तर प्रमुख मान्यवर म्हसळा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राजेश कदम, जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष किशोर मोहिते, उपाध्यक्षा गीतांजली भाटकर हिशोब तपासणीस कैलास कळस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनंत येलवे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अरुण माळी, तालुका कार्याध्यक्ष रमेश जाधव ,सरचिटणीस प्रकाश मांडवकर, विजय घाटगे, सुमित्रा खेडेकर, समीर पाष्टे उपस्थित होते.
सुरुवातीला कै.सिंधुताई सकपाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तद्नंतर शिक्षकांचे पंचप्राण दादासाहेब दोंदे, शिक्षक नायक अरुण भाई दोंदे, शिक्षक नेत्या सुलभाताई दोंदे, पहिल्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रास्ताविक शुभदा दातार यांनी केल. यामध्ये संघटनेचे वर्धापन दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच संघटनेची कार्य पद्धती संघटना शिक्षकांच्या हक्कासाठी लढत असताना आपले कर्तव्य विसरत नाही हे स्पष्ट केले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यातील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक- भाग्यश्री विपुल चक्करवार, द्वितीय क्रमांक- श्रेया मंगेश कदम, तृतीय क्रमांक- इंदिरा गंगाधर चौधरी, उत्तेजनार्थ बक्षीस -आरती अशोक राठोड व ज्योती महादेव पवार यांना देण्यात आला. यानंतर सावित्रीबाई फुले व जिजाबाई यांच्या जयंती पंधरवडा निमित्ताने महिला शिक्षिकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राजेश कदम यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले या संघटनेच्या माध्यमातून असेच चांगले कार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली त्याच प्रमाणे कोव्हीड काळामध्ये शाळा बंद असल्या तरी सुद्धा आपण स्थानिक पातळीवर पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्याच प्रमाणे आपले पंचायत समिती मध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत यासाठी आपण सर्वांनी मिळून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष किशोर मोहिते यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेचा इतिहास सांगत असताना ही संघटना ७ जानेवारी १९५४ रोजी दादासाहेब दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे उपस्थितीमध्ये पहिले अधिवेशन झाले याची माहिती देऊन संघटना ही जागतिक पातळीवर ती असून आपले शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतेच याबरोबर गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण घेत असते. १९६४ ला संघटनेने ५४ दिवसाचे शाळा बंद आंदोलन केले यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही त्याचप्रमाणे आता कोवीड काळामध्ये आपण देखील हीच भूमिका घ्यायची आहे त्याप्रमाणे आपले तालुका, जिल्हा पातळीवरील जे प्रलंबित प्रश्न असतील ते संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
संघटनेचे माजी सल्लागार अनंत येलवे, अरुण माळी, गीतांजली भाटकर,कैलास कळस, प्रकाश मांडवकर यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षक संघ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटने मध्ये काम करत असताना संघटनेवर आपली निष्ठा असणे महत्त्वाचे आहे संघटनेने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण संघटनेसाठी काय केले याचा विचार आपण केला पाहिजे. आपण संघटना वाढीसाठी सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे. मी नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत याच एका संघटनेचा सभासद राहिलो असून २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहे तरी आतापर्यंत मला सर्वांनी सहकार्य केले याबद्दल सर्वांचे आभार मानून यानंतर देखील मी ७ जानेवारी च्या कार्यक्रमाला येत राहील असे सांगितले. शिक्षकांनी आपले प्रश्न संघटना पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवले तर त्याची सोडवणूक नक्कीच होईल असे स्पष्ट केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता शिरणे, संगिता आंबेडकर, सोनाबाई शिंदे, भानुदास राठोड, शिवाजी चव्हाण, नागेश शेवडीकर, प्रविण सोनवणे, गौतम बागलानी, विपुल चक्करवार, यांनी सहकार्य केले. भानुदास राठोड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
सोबत फोटो - म्हसळा येथे शिक्षकसंघ वर्धापन दिन साजरा
Post a Comment