कुणबी युवा तळा ग्रामीण तर्फे सत्कार.
तळा:किशोर पितळे
तळा तालुक्यातील कर्नाळा गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉ.जगदीश हिराजी शिगवण यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयात पी.एच.डी पदवी प्राप्त केली. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कुणबी युवा तळा ग्रामीण यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार केला. डॉ.जगदिश शिगवण हे कर्नाळा गावचे सुपुत्र असून गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातील असून प्रतीकुल परिस्थिती वर मात करून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हिपदवी प्राप्त करीत असताना अनेक संकटांना आणिअनेकसमस्यांना तोंड द्यावे लागले.उच्च शिक्षणा शिवाय पर्याय नाही.इंजिनिअरिंग,डॉक्टर सर्वजण होतात पण विद्यार्जनाचे मनापासून करण्याची ईच्छा असल्याने मी हे क्षेत्र निवडले.असे सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. त्यांनी आपल्या शिक्षणाचा व जीवनाचा खडतर प्रवास सांगितला.यावेळी मान्यवर व विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन भारावून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले. डॉ. जगदीश शिगवण यांनी एम. ए. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नालीटिकल स्टडी ऑफ वुमनटेम एम्पावरमेंट सेल्फ ग्रुप इन कोकण रिजनया विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. या यशाबद्दल रायगड जिल्ह्यासह संपूर्ण तळा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या सत्कार समारंभा प्रसंगी कुणबी युवा अध्यक्ष राजू थीटेकर यांनी सांगितलेकी जिद्दीच्या जोरावर अशक्य अशी गोष्ट सिद्ध करु शकतो. आज मोबाईल च्या युगात संपूर्ण जग आपल्या हातात आले आहे परंतुत्याचा वापर योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे.त्यामुळे महत्त्वाचे जे पाहिजे तेच घ्यावे.असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला डॉ. शिगलण यांचा आदर्श समोर ठेवून पुढील वाटचाल करावी असे मनोगतपर मार्गदर्शन केले यावेळी सुनील बयकर, मुख्याध्यापक तळा शाळा किरण नागावकर, आमिष भौड, संतोष जाधव, किरण अडखळे, मनोज वाढवळ, स्वप्नील वरंडे, जितेंद्र भोसले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment