तळा :किशोर पितळे
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तळा शाखेत प्रतीवर्षा प्रमाणे २५जाने.ते ३१जाने.ठेव वाढ सप्ताहाचे खास आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने३१जाने रोजी श्रीसत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते पुजेचा मान सौ. श्री अविनाश नाक्ती सपत्निक यांच्या हस्ते करण्यात आली. रायगड बँक सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक समजली जात असून सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त  रायगडातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव बँक आहे.
सदर बँकेला ६० वर्षे झाली असून ठेवी व कर्जाचा वाढता आलेख आहे. ३१ जानेवारी २२ या कालावधीत ठेवीचे उद्दिष्ट २०कोटी असून कर्ज १५ कोटी असून ३५ कोटी एकत्रितला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वितरण करून महीला सबळीकरणाला उंचावण्यात मदत करीत आहे तसेच शासकीयसेवेतील नोकरदारांना हप्ता कर्ज, घरतारण, जमीनतारण, वस्तूतारण, सोनेतारण घरबांधणी कर्ज वितरीत करीत असल्याने विनम्र सेवा, आकर्षक व्याज दर, जेष्ठ नागरिक अर्धा % दर यामुळे ग्राहकांचा या बँकेकडेआकर्षित होत आहेत.सदर कार्यक्रमात ठेवीदार खातेदारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविका पवार मँडम व गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक ज्ञानेश्वर भोईर,माजी संचालक गोविंदशेट भोईर, कानू विचारे मंहमद परदेशी, अँड चव्हाण,हाँटेल व्यवसायीक दिपक भौड, डॉ.वडके नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत रोडे चंद्रकांत भोरावकर सिराज खाचे शाखा व्यवस्थापक प्रमोद दळवी बँक निरीक्षक उल्हास उपाध्ये,कँशिअर धवल टिळक अकाउंटंट नंदकुमार शितोळे कलेक्टीग एजंट शिपाई उपस्थित होते.
 
 
 
  
Post a Comment