म्हसळा तालुक्यातील कु. अर्चना येलवे हिने सादर केलेल्या काव्याचा सन्मान !

म्हसळा तालुक्यातील व्हिजन एज्युकेशन फाउंडेशन व तहसील कार्यालय म्हसळा तर्फे भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात उत्तम काव्य सादर करणाऱ्या अर्चना येलवे हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.म्हसळा तालुक्यातील करंबे ताम्हाणे गावची अर्चना डोंगराळ विभागातून रोज पायी प्रवास करून तालुक्यात शिक्षण घेताना गतवर्षी म्हसळा तालुक्यातून बी.ए. उत्तीर्ण होताना तालुक्यातून प्रथम आली होती . शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी कलेक्टर होण्याचं स्वप्नं मनी बाळगणाऱ्या अर्चनाने आता पासूनच अभ्यासाची पूर्वतयारी सुरू केली आहे.तिच्या या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी गावचे ग्रामस्थ / पालक व प्राचार्य वर्ग देखील तिला प्रोत्साहित करत आहेत . प्रत्येक उपक्रमात सक्रिय राहून यश मिळणाऱ्या अर्चनाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा