धक्कादायक ! क्षुल्लक वादातून कुटुंब वाळीत ; म्हसळा येथे जात पंचायतीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल


समाजाच्या पुढाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा 
पोलिसांकडे तक्रार दिल्याने कुटुंबाला टाकले होते वाळीत, खारगाव बुद्रुक येथील घटना

रविंद्र पेरवे

श्रीवर्धन- समाजातील वाळीत टाकण्याचे प्रकार आद्यपही कमी होण्याचे नाव घेत नाही. म्हसळा तालुक्यातील खारगाव बु येथील कोळी समाजाच्या पुढाऱ्यांवर म्हसळा पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाजात विषय न घेता परस्पर पोलिसांकड़े तक्रार केल्याचा राग मनात ठेवून पुढाऱ्यांनी फिर्यादी यांना दंड लावला होता. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची सुरुवात मे 2021 पासून सुरू झालेली. आरोपी किसन आगरकर याने फिर्यादीच्या वाहिनीच्या घरी नकळत जाऊन स्वतःच्या भाऊ विषयी उलटसुलट सांगितले व त्याच्या शी लग्न करशील तर बघून घेईल असे धमकावले मात्र त्याला न जुमानता फिर्यादीच्या भावाचं ठरल्याप्रमाणे लग्न झाले.  पुढे लग्न झाल्यावर फिर्यादीने तळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र लग्न झाल्याचे समजलेल्या आरोपी किसन याने गावातील पुढाऱ्यांना एकत्र केले व फिर्यादीच्या विरोधात जात पंचायत उभी केली. त्यानंतर देखील आरोपीने फिर्यादी यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे पोलीस तक्रारीत म्हंटलें आहे. आपल्या विरोधात समाजात विषय न घेता परस्पर म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली याचा राग मनात ठेवून जातपंचायत पदाधिकारी किसन आगरकर, श्रीरंग वेटकोळी, अरुण वेटकोळी, हिराचंद बसवत, दीपक पाटील, निवृत्ती पाटील, महादेव वेटकोळी, दर्शन आगरकर, द्वारकानाथ पाटील व केशव वेटकोळी यांच्या विरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. 

आरोपी अद्यापही अटक नाही 
- गुन्हा दाखल होऊन एक आठवडा उलटून गेला तरी पोलिसांनी आरोपींना अटक नाही केली याबाबतीत फिर्यादी यांनी खंत व्यक्त केली.  आजही जातपंचायत चे पुढारी घरासमोरून जाताना नको ते शब्द वापरून मानसिक त्रास देत आहेत, घरावर दगड मारतात, गाडीचे टायर पंक्चर व मोडतोड केली आहे असे फिर्यादीने आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. 

आंतरजातीय विवाह केले म्हणून दंड 
- चुलत बहिणीने आंतरजातीय विवाह केले म्हणून जातपंचायत ने चुलत्यांना वीस हजार दंड केले. दंड भरल्याशिवाय गावात प्रवेश नाही असा फतवा काढला होता. त्यावेळी दंड भरल्यानंतर त्यांना समाजात घेण्यात आले. मात्र सध्या फिर्यादीच्या कुटुंबासह चुलत्यांना देखील समाजापासून दूर ठेवले आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्याने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी अंनिसने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने सर्व पोलीस ठाण्यांमधून पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांच्या कार्यशाळा आयोजित करून कायदा प्रचार व प्रसार मोहीम राबवली होती. त्यावेळी जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांमधून याची अंमलबजावणी झाली होती. मात्र सर्वत्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अद्यापही अनेक गावांमधून असे प्रकार घडतात. जिल्हा पोलीस कार्यालयाने या कार्यशाळा पुन्हा घ्यायचे ठरवल्यास साधन व्यक्ती व प्रचार साहित्य याबाबत महाराष्ट्र अनिस सहकार्य करण्यास तयार आहे ज्यामुळे पोलीस पाटला मार्फत गावोगावी या कायद्याचा प्रचार व प्रसार होऊन गुन्ह्यांची संख्या कमी होईल 
-मोहन भोईर (जिल्हा कार्याध्यक्ष - मअंनिस, जिल्हा रायगड)


सामाजिक बहिष्कार अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून  आरोपीबाबत पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करू. 
- प्रमोद बाबर, तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन पोलिस ठाणे. 

सन व दाखल गुन्हे 
2016 - 7
2017 - 3
2018 - 4
2019 - 1
2020 - 1
2021 - 0
2022 - 1
 जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा