शिवसेना शिहू विभागाच्या वतीने मनोज मोकल यांचा सत्कार



मंजुळा म्हात्रे ( प्रतिनिधी )

श्री गणेश रिक्षा चालक मालक संघटना नागोठणे कोळीवाडा अध्यक्ष पदी मनोज मोकल तसेच उपाध्यक्ष पदी प्रकाश कुथे, सचिव पदी जयराम खाडे, व खजिनदार पदी रत्नकांत जवके यांची निवड झाल्या बद्दल शिवसेना शिहू विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळी उपस्थित दीपक पाटील शाखाप्रमुख चोळे, हिराचंद्र बोन्डेकर शाखाप्रमुख कुहिरे,गणपत खाडे ग्रामपंचायत सदस्य शिहू तथा मा. सरपंच, सरिता पाटील शिहू विभाग संघटिका, संदीप ठाकूर शाखाप्रमुख तरशेत, सुधीर पाटील उपशाखाप्रमुख शिहू, राहुल ठाकूर युवासैनिक इत्यादी उपस्थित होते.

२० वर्षाने झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत मनोज मोकल हे ३३ मतांनी विजयी झाले.या वेळी मोकल यांनी श्री गणेश रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा