रविंद्र पेरवे
लोणेरे - श्रीवर्धन तालुक्यातील संजीवनी सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी, 9 जानेवारी 2022 रोजी वडवली येथील आगरी समाज मंदीरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. मुंबईतील लायन ताराचंद बापा हॉस्पिटल व संजीवनी कॅन्सर केअर हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून वैद्यकीय सेवा दिली.
ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध अस्थीविकार तज्ज्ञ डॉ.जयंत गावंड, डॉ. देवेंद्र भोसले, डॉ. आदित्य माणके, डॉ. अजित पाशीलकर, डॉ. नंदा कदम, डॉ. अजित कोरडे, डॉ. शमीम, डॉ. गुरुबच्चन सिंग खन्ना आणि नर्सिंग स्टाफ यांनी तपासणी व मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले. एकूण 240 रुग्णांना रक्तदाब, शुगर, ईसीजी, हृदयविकार, स्त्रियांचे आजार, तसेच हाडांचे आजार अशा विविध आजारांवर उपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टरांकडून देण्यात आले. या संपूर्ण शिबिराच्या आयोजनासाठी संजीवनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कुमार गाणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव महेश चौलकर, खजिनदार नवनाथ कांबळे, सल्लागार जयवंत कांबळे, विजेश कांबळे, रफिक जहांगीरदार, नुझहत जहांगीरदार, सदस्य मनोज चौलकर, संदेश गाणेकर, दिपक नाक्ती, योगेश बिराडी, प्रमोद कांबळे, प्रताप पाटील, सुकुमार चौलकर, ओमकार गाणेकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी माजी सभापती मीनाताई गाणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चाळके सरांनी उत्तमरीत्या केले.
शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आगरी समाज वडवली अध्यक्ष संतोष नाक्ती, पोलिस पाटील दिलीप नाक्ती, ग्रामपंचायत वडवली सदस्य दिपक कांबळे, माजी सरपंच विजय पांडव, संतोष पाटील, श्री. बळीराम कांबळे, सुदेश कांबळे, श्याम धुमाळ, विठोबा नाक्ती, महेश नाक्ती, हरिश्चंद्र चाळके व मान्यवर उपस्थित होते. वडवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. संजीवनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आगरी समाज वडवली व सर्व वडवली ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
Post a Comment