सुपारी बागायत दारांसमोर आर्थिक संकट
पुष्कर रिळकर - वेळास आगर
निसर्ग - तोक्ते चक्रीवादळ व भरपाई
३जून २०२० ल झालेल्या निसर्ग चक्री वादळ आणि २०२१ मध्ये झालेला तोक्ते चक्रीवादळ या मुळे श्रीवर्धन तालुक्यातील सुपारी, नारळ बागायत दारांचे अपरिमित असे नुकसान झाले.४०-५० वर्ष जुन्या बागायती वादळात जमिनदस्त झाल्या. यामुळे या मुळे बागायत दारांच्या तोंडचा घास या वादळात निघून गेला. शासनाने तुटपुंजी का होईना पण मदत केली. त्या मदतीतून बागायती साफसफाईचा खर्च ही निघाला नाही. तसेच "मनरेगा" योजना कोकणासाठी पुन्हा चालु करण्यात आली पण आज २ वर्ष होत आले पण कोणालाही या योजनेतून लाभ अथवा मदत मिळालेली नाही.
अपुरी रोपनिर्मिती व त्यामुळे उशिराने झालेली लागवड
दरवर्षी बागायतदार थोड्या फार प्रमाणात आपल्या बागायती मध्ये रोप तयार करुन ती रोप सकस व मोठी झाल्यावर आपल्या जागेत लावत असत.पण लागोपाठ झालेल्या या वादळानंतर बागायती मध्ये मोठ्या प्रमाणावर घाण व गवताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बागायत दारांची तयार केलेली रोपे जास्त सूर्यप्रकाश व रोपांवर जमा झालेली घाण या मुळे कुजून गेली. कृषी विभागाकडून रोपवाटिका निर्मिती साठी काहींना परवाने देवून रोप बनविण्याची परवानगी देण्यात आली ती रोप आता ६-७ महिन्यांची झाल्यावर बागायत दाराना "प्रति रोप ३ रु." या दराने देण्यात आली आहेत. ही मिळालेली रोप २ वर्षांनी सकस व लावण्यायोग्य होतील. त्यामुळे पुन्हा बागायती मध्ये रोप लावण्यासाठी २-३ वर्ष इतका कालावधी जाणार असल्याचे दिसते. व त्याला सुपारी येण्यासाठी ४ वर्ष लागतील असे बागायतदार सांगतात. तसेच हि रोप निर्मिती अपुरी असून अनेक ठिकाणीं कृषी विभागाने दिलेली रोप कमी पडल्याचे दिसते.
अडते, गट बागायत दार सहकारी पेढ्या व बागायतदार यांना मिळणारा मोबदला.
वादळंमुळे सुपारीचा पुरवठा कमालीचा कमी झाल्याची दिसून येत आहे. श्रीवर्धनी सुपारीच्या प्रजातीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण एका पाठोपाठ एक झालेल्या वादळामुळे या सुपारीचा तुटवडा बाजारात दिसून आला.यामुळे श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर मधील सुपारी खरेदी विक्री गट बागायतदार यांच्या सोबत अनेक नवीन व्यापारी अडते यांनी या सुपारीच्या खरेदी साठी मागणी दर्शविली. यामुळे वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा सोबत बाजारात आलेले अडते यामुळे दरवर्षी सरासरी ५ ते १० रु. इतका दराने वाढणारा सुपारी दर गेल्या वर्षी ५३ रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे असोली सुपारीला १किलो ला २१८ रु. इतका दर गटबागायत दार संघ दिवेआगर यांच्या कडून दिला जात होते तोच अचानक आलेले अडते यांनी सुपारीचा भाव २५० रू. किलो इतका केला व त्यांनतर गतवर्षी दिवेआगर सुपारी बागायत गट संघाने २७० रू. किलो इतका विक्रमी भाव बागायत दाराना मिळवून दिला. तसेच नविन आलेल्या व्यापाऱ्याने २०२२ साठी च्या सुपारीला ३००रु. किलो असा सुपारीला दर देण्याचे अगोदरचे घोषित केल्याचे बागायत दार कडून समजले.
श्रीवर्धनी सुपारी म्हणजे काय ?
कोकण कृषी विद्यापीठाने "श्रीवर्धन रोठा" या स्थानिक वाणातून 'श्रीवर्धनी' ही जात प्रसिद्ध केली.या प्रजातीच्या सुपारीची वैशिष्ट्यं म्हणजे ह्या जातीची सुपारी आकाराने मोठी असते. व या सुपारी मध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही सुपारी चवीला गोड व मऊ आहे. त्याच बरोबर या प्रजातीचे विशेष म्हणजे ह्या मध्ये साखरेचे प्रमाण २.४५ ते ३.५९ टक्के आहे हे प्रमाण अन्य प्रजातींच्या तुलनेत उत्तम असल्याचे दिसून येते. या सुपारीचा आकार, मऊपणा आणि गोडी यामुळे या सुपारीला मुंबई सह देशभरातील बाजारांमध्ये चांगला भाव मिळतो. गोवा येथील चांदा- बांदा बाजारपेठे मध्ये सुपारीला ८५०-९०० रू. किलो इतका प्रचंड भाव मिळतो. त्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व वेळास आगार या ठिकाणची सुपारी उत्तम प्रतीची मानली जाते व या ठिकाणच्या सुपारीला बाजारात मागणी असून भाव ही चांगला मिळतो.
संशोधनाची गरज, स्थानिकांची आर्थिक परस्थितीत सुधारणा, सरकारी निकष.
हवामन बदल, अचानक होणारे वादळ यांमुळे या सुपरीच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. ह्याच जातीचे ह्याच प्रतीचे व लवकर म्हणजेच ३-४ वर्षांत पीक देईल असे रोप कृषी विद्यापीठाने विकसित करणे गरजेचे आहे.जेणे करुन होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमधुन या बागायतदारांना लवकर स्वतः च्या पायावर उभा होता येईल.
श्रीवर्धन मधील विशेषत: दिवेआगर, वेळास आगर या ठिकाणच्या सुपारीला असणारी मागणी व वादळामुळे कमी झालेले उत्पादन यामुळे बागायतदार भरडला गेलाय. यांची आर्थिक स्थिती उंचविण्यासाठी व्यापारी अडते, गट बागायत दार संघ यांनी बागायतदाराना ज्या प्रमाणे चांदा- बांदा बाजारपेठेत ८५०-९०० इतका दर मिळतो त्या प्रमाणे याच स्थानिक पातळीवर याच ठिकाणी यांच्या कडून ३५० ते ४५० इतका किलोला दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
त्याच बरोबर सरकारी निकषांमध्ये सुपारी चा वर्गीकरण अमली/नशाजन्य पदार्थ यांच्यात होतो या मुळे या सुपारी ची निर्यात साठी अडचण होत असल्याचे दिसते. हि सुपारी मुखवास तसेच अनेक अन्न पदार्थ यांमध्ये वापरली जाते. यामुळे सुपरीचा खाद्य पदार्थ यांमध्ये वर्गीकरण होणे गरजेचे आहे.
निसर्ग चक्री वादळ आणि लगेच झालेला तोक्ते चक्रीवादळ यामुळे सुपारीची झाडे मोडून पडली व उरलेले झाडे आहेत त्यांची मुळ हल्ल्या मुळे सुपारी च्या झाडाचा जोस कमी झाला आहे. यांमुळे एका झाडाला ३-४ किलो येणारी सुपारी आता फक्त १-२ किलो इतकीच मिळत आहे.- सिद्धांत पाटील, बागायतदार दिवेआगार
वाढलेला खतांचा दर,बागायतीला पाणी लावण्या साठी होणारा खर्च, साफसफाई खर्च हे न परवडणारे झाले आहे यामुळे सुपारी चा दर वाढणे गरजेचे आहे जेणे करुन बागायत दारांच्या उत्पन्नऻत वाढ होईल.
- ओमकार झगडे ,बागायतदार वेळास आगार
Post a Comment