टीम म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्र राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जानेवारी, 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींच्या कोविड लसीकरणास सुरुवात झाली.
या वयोगटामधील जिल्ह्यातील युवक युवतींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 असून आज आठव्या दिवशी रायगड जिल्ह्यात सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत 50 हजार 461 लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदन पाटील यांनी कळविली आहे.
Post a Comment