म्हसळ्यातील महीला गुंतल्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात


शहरासह तालुक्यात २१ दिवस रहाणार हळदी कुंकू  मोहोत्सव.
लुटण्याचे वाणांत मास्क,सॅनी टायझर, हँड वॉशचा वापर होणार

संजय खांबेटे : म्हसळा 
हिंदू धर्मांत मकर संक्रांत सणाला विशेष महत्व आहे,म्हसळा शहरांत सुध्दा आज मकर संक्रांतीच्या सायंकाळ पासून हळदी कुंकू उत्सव जोरदार सुरु झाला.शास्त्रीय दृष्टीकोनातून मकरसंक्रात सणाला विशेष महत्त्व आहे.या दिवशी वातावरणात बदलाला सुरुवात होते.पृथ्वीवरील सूर्यप्रकाशाचे प्रमाण वाढते आणि तपमान वाढीस लागते.सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो.मकर संक्रांत
हळदीकुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांत ते रथसप्तमी (१४जानेवारी ते ७ फेब्रु ) या कालावधीत करता येतो.पूर्वी हळदी कुंकवासोबतच वाण म्हणून मातीचे सुगडे, हिरव्या बांगड्या,काळे मणी,जोडवे ही सौभाग्य लेणी दिली जात होती. आता मात्र घरातील नवीन सून ५सुवासिनीना असे  वाण देते. स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे.संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी,अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित आहे.घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे. सार्वजानिक हळदी कुंकू केले जात असल्याने वेळही वाचतो आणि परंपराही जपली जाते. अनेक महिला मंडळ हळदी कुंकवाच्या निमित्ताने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमही राबवतात.यंदा . संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली जात असून महिलांच्या मागणीनुसारच बाजारपेठेत वाण म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. रोप, कुंडी, कापडी पिशव्या, कागदी लगद्याच्या वस्तू, दागिने, कापडी पर्स तर बचत गटानी लुटण्याचे वाणांत मास्क, सॅनी टायझर, हँड वॉशचा वापर जास्त प्रमाणात करण्याची योजना केली आहे.आज म्हसळा शहरांत श्रीमती सुलभाकाकी करडे यांचे अध्यक्षते खाली त्वष्टा कासार समाजाचा हळदीकुंकू कार्यक्रम श्रीराम मंदीरात प्रचंड उत्साहांत संपन्न झाले यामध्ये श्रीमती छाया करडे, तन्वी करडे, प्राजक्ता करडे, श्रेया करडे, नेहा करडे, करुणा करडे,कल्पिता करडे,अनिशा करडे वनिता समेळ यानी उत्कृष्ट नियोजन केले होते.

"म्हसळा शहरात समाज निहाय हळदी कुंकू कार्यक्रम करण्याची प्रथा आहे. देवज्ञ समाज,त्वष्टा कासार समाज, कुंभार समाज ब्राह्मण समाज, शिंपी समाज, सखी सहेली (मंच), मातोश्री पार्क,लवासा येथील माहिला मंडळ कार्यक्रम उत्कृष्ट राबवितात, तर ग्रामिण भागात स्थानिक बचत गट व महिला मंडळे हळदी कुंकू कार्यक्रम नियोजित करतात "
मिनल ढवळे, कुंभार आळी, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा