फोटो - आगरी संघटनेच्या कार्यक्रमात निलेश नाक्ती यांचा सत्कार करण्यात आला.
वडवली युवकांचा समाज एकीकरणाचा नारा, मान्यवरांची उपस्थिती.
रविंद्र पेरवे : श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील मुंबईस्थित आगरी युवा संघटनेचा पाचवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी, ता 9 जानेवारी 2022 रोजी विले पार्ले येथे सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगरी युवा संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त संघटनेने 'गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा' आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेने पाच वर्षांत केलेलता कामाची माहिती धनंजय चौलकर यांनी दिली. कार्यक्रमाचे उदघाटन श्री उमेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण नाक्ति हे होते. सुभाष चौलकर , सुनील नाक्ती, चंद्रकांत नाक्ति , संगीता नाक्ति , शैलेन्द्र चौलकर , उपेंद्र पाटिल ,संदेश पाटिल , दिनेश पयेर , निशित गायकर व इतर उपस्थिति मान्यवारांचे आभार व सत्कार रूपेश चालके , , संतोष कांबले , नीलेश गानेकर , मंगेश बिराड़ी , मंगेश कांबले , कृष्णा बिराडी, राजा पाटिल , संकेश बिराडी, नितेश नाक्ती ,रोहित खानलोस्कर, अनिल नाक्ति आदी केला.
यावेळी प्रतिकुल परिस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, रोजगार, करिअर, आगरी समाज बळकटी करण, युवा परिवर्तन, आगरी संस्कृतीकरण, आगरी महिला लघुद्योग, महिला सक्षमीकरण, आगरी महिला एकीकरण अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन श्रीवर्धन तालुक्यातील सहकार्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश नाक्ति यानी केले. आजघडीला आगरी युवकांपुढे अनेक आव्हाने आहेत. ती समर्थपणे पेलण्यासाठी त्यांना योग्य दिशा दाखवणे गरजेचे आहे. यासाठी आगरी युवा युवा संघटना'ही समाजातील युवकांना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करत असल्याचे प्रतिपादन प्रमुख मान्यवरांनी केले. संघटनेने आत्तापर्यंत 125 हुन अधिक तरुणांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून शिक्षण घेऊ दिले आहे याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना करियरविषयक मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नाक्ती यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन धनंजय चौलकर यांनी केले. कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्या सर्वांनी या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित दर्शवली. अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल लमिषा चौलकर , निकिता नाक्ति , जिग्नेश बिराड़ी यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले . आगरी समाज परिवर्तनसाठी एकत्र येण्याची साद यावेळी युवकांनी दिली. शिक्षणासाठी आवश्यक मदत करण्याचा निर्धार यावेळी आगरी युवकांनी केला.
Post a Comment