शहरातील शासकीय गोडाऊन अन्यत्र हलवावे अथवा गोडाऊन जोड रस्ता बदलावा. : म्हसळाकरांची मागणी अद्यापही लाल फितीत.


म्हसळा शहरातील शासकीय गोडाऊन अन्यत्र हलवावे अथवा गोडाऊन जोड रस्ता बदलावा.: म्हसळाकरांची मागणी अद्यापही लाल फितीत.

संजय खांबेटे : म्हसळा 
राज्य शासनाचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे धान्य गोडाऊन हे म्हसळा शहरातील नागरी वस्तीत असून ते कन्याशाळे शेजारी आहे. ते अन्यत्र हलवावे अगर गोदामाचे सलग्न (Aproch Road) रस्ताअन्य मार्गाने द्यावा अशी आभ्यासू मागणी म्हसळ्याचे पहीले महापौर दिलीप कांबळे यानी केली होती.या मागणीला तब्बल ५ वर्ष होऊनही महसुल विभागा ने मागणीअनुत्तरीत ठेवली आहे असे दिसते.
  तालुक्याचे गोडाऊन तत्कालीन म्हसळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मध्यवर्ती असे कन्याशाळा परिसरांत ५० ते ५२ वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने तालुक्यातील  नागरिकाना शासनाकडून येणारे ध्यान्य(Ratation) साठा करणे व वितरण करणे यासाठी गोडाऊन बांधले ,तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारा गोदामाचा जोड रस्ता (Aproch Road) सुद्धा महसुल विभागाचे निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग देखभाल- दुरुस्ती करत आसे, आता मात्र नागरी वस्तीतून जाणाऱ्या ह्यरस्तावर नगरपंचायत प्रशासनाने सुमारे १ कोटी रुपये खर्च नागरी सुविधा म्हणून निधी खर्च केला आहे. एकता नगर, लवासा, मातोश्री पार्क, विद्यानगरी, रोहीदास नगर , वाळवटकर कॉम्प्लेक्स, शंकर मंदीर परिसर या भागातील नागरीकांच्या रहदारीच्या सुमारे ४ते ६ टन क्षमतेच्या या रस्त्यावरून शासकीय गोदामाच्या २५ ते ३० टन धान्य घेऊन  येणाऱ्या जाणाऱ्या १६ / २० टायरच्या रस्त्यांसाठी आवश्यक रुंदीचा व मजबूत रस्ता नसल्यामुळे रस्त्यासाठी खर्च केलेला निधी पाण्यात जाणार आहे.


या भागात संपूर्ण शहरासाठी असणारी शाळा,अंगणवाडी, आणि हिंदू समाजा ची श्री, ग्रामदेवता धावीर मंदीर, श्रीराधाकृष्ण मंदीर, श्री हनुमान मंदीर, श्री. गणेश मंदीर, श्री शंकर मंदीर, श्रीअक्कलकोट स्वामी मंदीर, अशी ६ मंदीर याच मार्गावर आहेत.  


पुरवठा विभागाच्या शिधा पत्रिका धारकाना असणाऱ्या विविध योजना अंर्तगत तालुक्यात मासिक ५०० ते ६०० मे.टन (तांदूळ, गहू, साखर, डाळी,खाद्यतेल) येत असते. ते धान्य तालुक्यातील ८२ गावातील ४०ते ४५ रास्त भाव धान्य दुकानांमार्फत वितरण करण्यात येते. त्यामुळेच या मार्गावर सतत क्षमतेपेक्षा जास्त वहातुक होत असते, अवजड वाहनांचा त्रास साने आळी, व अन्य घराना होत असतो. 

"गोडाऊनच्या मार्गावर विविध शाळा , शाळेत ये- जा ४ते १० वर्ष वयाची छोटी मुलांची शाळेंत जाण्या येण्याचा मार्ग हाच आसल्यामुळे, तसेच मंदीरात जाण्याचा जेष्ठ नागरीक महिला यांचा सुद्धा हाच मार्ग आसल्यामुळे गोडाऊनच्या २०ते ३० टनांचे वाहनांचा नागरी वहातुकीचे रस्त्याला,परिसरांतील घराना भविष्यात धोका होण्याचा संभव आहे.५ वर्षापूर्वी तत्कालीन महापौरानी मागणी करूनही शासन दुर्लक्ष का करीत आहे"
सचिन करडे, तांबट आळी म्हसळा.



"शासकीय गोदामाचा या परिसरांतील जनतेला त्रास होत असल्याने आम्ही रोहीदासनगरातील मंडळीनी गोडाऊन या भागातून अन्यत्र हलवावे अशी मागणी केली आहे, शासनाने त्या जागी तहसील कार्यालय किंवा अन्य शासकीय कार्यालय बांधावे".
मंगेश म्हशीलकर,रोहीदास नगर म्हसळा.





"गोडाऊन या भागातून अन्यत्र हलविणेबाबत धोरण शासनाचे  प्रस्तावित आहे "
समीर घारे,तहसीलदार म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा