एक हात मदतीचा फाउंडेशन तर्फे म्हसळा बस स्थानकाचे निर्जंतुकीकरण


म्हसळा(प्रतिनिधी)
तिसऱ्या लाटे मध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एक हात मदतीचा फाउंडेशन तर्फे म्हसळा शहरातील बस स्थानक स्वछ करून,स्थानकाचे सेनेटाइझरच्या साहाय्याने  निर्जंतुकीकरण करण्यात आले.

एक हात मदतीचा फाउंडेशन तर्फे शहरातील युवकांना एकत्र घेऊन आठवड्यातून एकदा समाजोपयोगी कार्य केले जाते.म्हसळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव धीम्या गतीने जरी वाढत असला तरी, खबरदारी म्हणून या फाउंडेशनच्या वतीने  वर्दळीचे ठिकाण असणार्या म्हसळा बस स्थानकाचे सोमवारी निर्जंतुकीकरण करण्यात आले.

यावेळी म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड,रा.जी.प शाळा चिचोंडे चे मुख्याध्यापक प्रशांत मोरे सर, एक हात मदतीचा फाउंडेशनचे सौरभ गोरेगावकर,संदीप गव्हाणे,निकेश कोकचा,मुकेश राजभर,केदार जोशी,मंगेश धीमर,संतोष उद्गरकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा