तळा(किशोर पितळे)
तळा नगरपंचायत निवडणुकीत आज अंतिम तारीख अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.४ प्रभात मतदान होणार असून प्रभाग १ मधून अमृता वि. टीळक प्रभाग ३ मधून वैभवी वि. ठसाळ १४ मधून रेश्मा र. मुंढे, डाँ. मालउद्दीन कुरूक्कर यांनी माघार घेतली आहे.
प्रभाग १)मध्ये राष्ट्रवादी च्या ग्रीष्मा बामणे व सेनेच्या शुभांगी मांडवकर यांच्या त सरळ लढत होणार आहे प्रभाग ३)मध्ये राष्ट्रवादीच्या यामिनी म्हेतर,सेनेच्या विद्या तळेकर व शेकाप च्या रोशनी तळेकर अशी तिरंगी लढत आहे. प्रभाग१० मध्ये १)शिगवण मंगेश रामचंद्र - राष्ट्रवादी २) फोंडळ प्रविण भागोजी - शिवसेना ३) वेदक संस्कृती हर्षद - शेकाप ४) वेदक किशोर गणेश - भाजपा प्रभाग चौरंगी लढत होणार आहे. क्रमांक १४ मध्ये १) मुंढे रितेश रविंद्र - अपक्ष २) मोरे देवयानी समीर - राष्ट्रवादी ३) मुंढे लता जनार्दन - अपक्ष ४) शिर्के योगेश वामन - शिवसेना ५)रहाटविलकर तब्बसुम म.सय्यद -अपक्ष अशी पंचरंगीलढत होणार आहे.असे १४ मातब्बर उमेदवार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली सेटिंग… त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड…. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी… आमिषांचं गाजर… अशा सर्व गोंधळात अखेर आज अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे.त्यामुळे आता नगरपंचायत निवडणुकीचा तळा शहरात धुरळा उडणार आहे. १७प्रभागापैकी १३ प्रभागातील निवडणूकपार पडलीअसूनचारजागांसाठी निवडणूक पार पडतआहेत.या चारप्रभागात जो बाजी मारेल त्याच्या हातात सत्तेची चावी राहणार आहे. त्यामुळे या चारही जागेसाठी राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment