म्हसळा नगर पंचायत हद्दीतील महत्त्वाची ३ गावठणे गायब


फोटो. - छायाचित्रात गावठण नं.५ मधील  जुनी घरे नवीन अपार्टमेंट दिसत आहेत.


  • पालकमंत्र्यांचे मतदार संघात महसुली तफावत 
  • नगरपंचायत हद्दीतील गावठणे द्रोणने मापून मिळावी 


संजय खांबेटे : म्हसळा 
महसुल अधिकारी हा आपली सर्व कार्यालयीन कृत्ये आणि कामकाज यांच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन महसुल १९६६ च्या अधिन राहून करतो परंतु म्हसळा शहरातील तब्बल तीन गावठणांबाबत महसुली अभिलेख व भूमी अभिलेख यामध्ये तफावत आहे.  तालुका भूमी अभिलेख खात्याच्या रेकॉर्ड प्रमाणे म्हसळा शहरांत केवळ ४ गावठणे नोंदीत आहेत.म्हसळा तहसीलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांजकडून मिळालेल्या माहीतीनुसार म्हसळा शहरात १ ते ७ गावठणे आसल्याचे लेखे उपलब्ध आहेत.
मागील ६५ वर्षापासून महसुली लेखात व तालुका भूमी अभिलेख यामधील तफावत दूर करण्यासाठी काहीच कारवाई किंवा तरतूद झालेली दिसत नाही. 
  गावठण क्रं.५-६ व ७ या ३गावठणांचे महसुलीलेख  हे भूमीअभिलेख विभागा पर्यंत पोहचेपर्यंत गहाळ कसे झाले हा प्रकार प्रचंड गंभीर विषयआहे.म्हसळा गावठण नं १मध्ये ५१७ प्रॉपर्टी, गा.नं २मध्ये १९ प्रॉपर्टी,गा.नं ३मध्ये ४० प्रॉपर्टी,नं ४ मध्ये २० प्रॉपर्टी आसल्या बाबत महसुल व भूमिअभी लेख यांचे एकमत आहे. परंतु गावठण नं ५ क्षेत्र १.४६ .१ प्रापर्टी हीस्से ४१ (कन्याशाळा शंकर मंदीर गोडाऊन,हरीजन हौसींग सोसायटी परीसर ),गावठण नं ६ क्षेत्र १.२८.५ प्रापर्टी हीस्से २५ (गौळवाडी परीसर),गावठण नं ७ क्षेत्र ६९.१ प्रापर्टी हीस्से ३० (बौद्धवाडी परीसर)या तीन गावठणाची तालुका व जिल्हा भूमी अभिलेख विभागात नोंदच नसल्याची धक्कादायक माहीती पुढे येत
"वास्तविक पहाता महाराष्ट्र जमीन महसुल लेखे ( महसुल आधिकाऱ्यांची कार्यपद्धती ) नियम१९६६ आणि त्याखाली केलेल्या नियमां प्रमाणे संबधीत महसुली लेखे सुस्थितीत ठेवणे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्य कर्तव्याचा भाग आहे." तरी सुध्दा दुर्लक्ष का होते हे अद्यापही अनुत्तरीत आहे. माहीती आधीकारातही जिल्हा भूमि अभिलेख चार गावठणांवर ठाम आहे. नगरपंचायत प्रशासनाने आपल्या आभिलेखांत योग्य दुरुस्त्या होण्यासाठी प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे असे जाणकारांचे मत आहे.

"गावठण नं ५ मधील प्रापर्टी धारक (कन्याशाळा शंकर मंदीर गोडाऊन, हरीजन हौसींग सोसायटी परीसर ) मंडळी व स्थानिक लोकप तिनिधी पालकमंत्री ना.अदीती तटकरे यांच्याकडे नगरपंचायत हद्दीतील सर्व गावठणे द्रोणच्या सहाय्याने मापून मिळावी अशी मागणी करणार आहेत"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा