Accident | म्हसळ्यात राष्ट्रीय महामार्गावर अपघात : जिवीत अगर वित्त हानी नसल्यामुळे नोंद नाही.




संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील अपघात फेम घोणसे घाटात आज वडखळ (JSW)कडून येणाऱ्या बल्कर MHO46F4348 ला घोणसे घाटातील शेवटच्या वळणावर अपघात झाला, तिव्र उतार व गाडीतील सिमेंटचे वजन यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत. दैव बलवत्तर म्हणून बल्करने एक पलटी खाऊनही ड्रायव्हरला मानसिक धक्याशिवाय कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समजते. सदर गाडीवर चालक अमित यादव वय -४० गाव  राजीपूर (उत्तरप्रदेश) आहे.
"पुणे -पौड- मुळशी- ताम्हीनी- माणगाव- दिघी" या NH 753F या राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाट ह्या स्टेट हायवेचे अपग्रेडेशन राष्ट्रीय महामार्ग असे होऊनही घोणसे घाट "अपघात प्रवण क्षेत्र" शिल्लक आहे. याचे आश्वर्य या परिसरांतील ग्रामस्थाना होत आहे.
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतची शहरे जोडणाऱ्या 'भारतमाला' प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेला हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असूनJSW कंपनीच्या बल्कर चा एकाच जागी अपघात होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत,तर याच ठिकाणी अन्य ५ ते ६ अपघात रस्ता नव्याने  झाल्यावर घडले आहेत. म्हसळ्यातील कर्तव्य दक्ष पोलीस या क्षेत्रांत घडलेल्या अपघातांची व अन्य अपघातांची नोंद का करीत नाही हा म्हसळ्यातील नागरीकांचा चर्चेचा विषय झाला आहे.

"अपघातांत जिवीत हानी अगर मोठया प्रमाणात वाहनांची वित्त हानी झाली तर संबधीत वाहन मालक, ड्रायव्हर पोलीस स्टेशनला तक्रार करण्याची हल्ली प्रथा आहे"
पी.टी. पाटील, ठाणे अम्मलदार म्हसळा पोलीस स्टेशन. 

"अपघाताच्यावेळी तुमची चूक नसेल तर वा तुम्हाला त्याबद्दल खात्री असेल तर किंवा नसली तरीही पोलीस तक्रार दाखल केल्याशिवाय समोरच्या वाहन चालकाच्या समोर तडजोडीची भाषा अजिबात करू नका.   त्यामुळे विमा कंपन्या,पोलीस, संलग्न यंत्रणा या देखील सुधार ण्यास मदत होईल.त्यांच्यावर एक प्रकारे काम व कर्तव्याचा दबावही राहील. कारण तुम्ही त्या विषया मध्ये लक्ष घातल्याने हे सारे शक्य होऊशकेल. अन्यथा 'चलता है ' म्हणूनसारेच 'आलबेल' वाटावे,अशी हल्ली स्थिती आहे."
प्रल्हाद बनसोडे, निवृत्त पोलीस आधिकारी.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा