खरसई (म्हसळा) येथे शनीवार दिं११ व रविवार दि.१२ डिसें.रोजी होणार भव्य कबड्डी व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
रायगड जिह्यासह मुंबईतील संघ येणार.
(म्हसळा प्रतिनिधी)
सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई खरसई यांच्या मार्फत ३८ व्या क्रिडा महोत्सवाच्या निमीत्ताने भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन शनीवार दिं११ व रविवार दि.१२ डिसें.२१ रोजी खरसई येथे होणारअसल्याचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोत यानी सांगितले.रायगड जिह्यासह मुंबई
तील काही संघ येणार आसल्याचे समजते.कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नामदेव खोत तर क्रिकेट स्पर्धचे रामदास कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धांसाठी तालुक्यातील पंचायत समीतीच्या सभापती छाया ताई म्हात्रे, माजी सभापती महादेव राव पाटील,खरसईचे सरपंच व शेका पक्षाचे युवा अध्यक्ष निलेश मादाड कर आणि विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी,आवर्जुन उपस्थित रहाणार आहेत. सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई खरसई यांच्या मार्फत खरसई आणि पंचक्रो शीत सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, कला आणि क्रिडा क्षेत्रांत विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते ,कार्यक्रमांत कोव्हीड १९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आसल्याचे संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पयेर यानी सांगितले.
Post a Comment