मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने ऑन लाईन अर्ज करणे आवश्यक
संजय खांबेटे : म्हसळा
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड - १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्ती च्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्व सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यां च्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यां च्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड १९ या आजारा मुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड १९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु.५०,००० (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहेत.हे सानुग्रह सहाय्य देण्या करिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल. या कामासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा कोविड आजाराने मृत पावले ल्या व्यक्तींच्या निकटतम नाते वाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज किंवा ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज दाखल करता येईल.म्हसळा तालुक्यातील एकूण ५४ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्याची माहीती तालुका आरोग्य आधिकारी यानी दिल आहे. गाव निहाय संख्या पुढील प्रमाणे म्हसळा शहर १४, मेंदडी ५,पाभरे ४, खरसई, निगडी वरवठणे प्रत्येकी ३, खामगाव,संदेरी प्रत्येकी २, दुर्गवाडी, वारळ,गोंडघर,भेकऱ्याचा कोंड, बंडवाडी, मेंदडी कोंड,वाडांबा,चिखलप, मांदाटणे, रोहीणी,खामगाव गौळवाडी, पांगाळोली, आगरवाडा,तोंडसुरे,आंबेत, सकलप,देवधर कोंड,कुडतोडी या गावा तील प्रत्येकी १ कोरोना रुग्ण दगावल्याचे तालुका आरोग्य आधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
Post a Comment