तळा ( प्रतिनिधी) परतीच्या पावसाने काेकणात भातशेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत असे आदेश दिले आहेत तळा तालुक्यात अंदाजे 1400 हेक्टर क्षेत्रावरती यावर्षी भातशेतीची लागवड झाली असून अवकाळी परतीच्या पडलेल्या पावसामुळे अंदाजे 720 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून या नुकसानग्रस्त भातशेतीचे जवळपास पंचनामे पुर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
तळा तालुक्यात गेल्या 10 दिवसांंपासून कृषीविभाग महसुल विभाग व पंचायत समिती विभागातून एकत्रितरित्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे केले गेले. तालुक्यात एकूण अंदाजे 1400 हेक्टरवर भातशेतीची लागवड केली हाेती परतीच्या अवकाळी पडलेल्या पावसामुळे अंदाजे 720 बाधीत झाले असून भातशेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे पुर्ण झाले असून या नुकसानीचा एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविण्याचे काम सुरू असल्याचे कृषी अधिकारी निलेश करंजे यांनी सांगितले.
काेकणात यावर्षी विक्रमी पाऊस झाला असून तालुक्यात यावर्षी अवकाळी पावसाने भातपिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानी बाबत सरसकट आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.
Post a Comment