तळा (किशोर पितळे)
निसर्ग ऋतू चक्र बदलल्याने अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात हजेरी लावली असुन रब्बी हंगामातील पिकांची दैना उडाली आहे. याचा फटकातळा तालुक्यात परतीच्या पावसाने काेकणात भातशेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाचअवकाळीपावसाचे मोठे संकटशेतकऱ्यांवर आले आहे.गेली दोन वर्षात संकटावर संकटाची मालिका सुरुच आहे नोव्हेंबर २०१९पासून कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ, तोक्तेवादळ,अवकाळी पाऊस मान्सून पुर्व पाऊस परतीचा पाऊस, प्रचंड पावसाने भात शेती पाण्यात कुजली अशा संकटावर मात करीत असतानाच आता अवकाळी पाऊस. तालुक्यात भात शेती नंतर कडधान्ये पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.परंतु अवकाळी पाऊस पडल्याने कडधान्ये,वाल पावटा,मटकी, चवळी,मुग हरभरा अशा विविध प्रकारच्या कडधान्ये,आंबापिके या पावसामुळे होणार नाहीत.काही जणांनी कडधान्ये पेरणी केली असल्याने केलेली मेहनत वाया जाणार आहे.संसारकसाकरायचा व घर खर्च कसा भागवायचा मोठ्या आर्थिक विवंचनात सापडला आहे.शेती कर्ज परतफेड कशी करायची कोरोना काळात सर्वाच्या नोकरी व्यवसाय वर गदा आली असून थोडे फार स्थिरावले जातअसताना या पावसामुळे तळा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.याबरोबरच वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.गुरांची वैरण पेंढा गवत कुजला आहे. काही शेतकऱ्यांनी भाताचे भारे शेतात रचूनठेवल्या असल्याने चांगले मोड आले असून पोहे करण्याच्या राहीले नाहीत.अशी वाईट परिस्थिती निर्माण झालीअसून"निसर्गराजा तु तरी आता आम्हाला जगु दे" अशी विनवणी बळीराजा शेतावर करीत आहे. काेकणात यावर्षी विक्रमी पाऊस झाला असून तालुक्यात यावर्षी अवकाळी पावसाने भात पिकाचे कडधान्ये अंतर्गत पिके यांचेमाेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानी बाबत सरसकट आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.
Post a Comment