श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस आधिकारी म्हणून प्रशांत रामेश्वर स्वामी कार्यरत



(म्हसळा प्रतिनिधी)
श्रीवर्धनचे  पोलीस उपविभागीय  आधिकारी म्हणून नुकतेच श्री.प्रशांत रामेश्वर स्वामी यानी पदभार स्वीकारला.श्रीवर्धनउपविभागीय पोलीस आधिकारी कार्यालया अंर्तगत श्रीवर्धन, म्हसळा,दिधी सागरी ही तीन पोलीस स्टेशन येत आहेत.स्वामी ह्यानी यापूर्वी गडचिरोली, सोलापूर,नांदेड,नागपूर येथे सेवा केली आहे. या सर्वांच्या अनुभवाचा फायदा त्याना श्रीवर्धन येथील कार्यकाळात नक्कीच  होईल.आपल्या कार्यकाळात सकारात्मक कार्यशक्ती चा वापर करून पोलीस स्टेशन अंर्तगत गुन्हेगारी कमी कशी होईल याबाबत नेहमीच कार्यशील असत. नेहमीच्या गुन्हेगारी व्यतीरीक ,आपल्या अंर्तगत पोलीस स्टेशनजवळ संर्पकात राहून
गुन्हेगारी तपासाबाबत मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी आहे.

"श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात गावागावात आजही गावकी अर्थात गावपंचायती कार्यरत आहेत. कुठल्याही कायद्याचे अधिष्ठान नसताना, गावाचा कारभार चालवत आहेत.  सामाजिक बहिष्कारा सारख्या जाचक कारवाईला सामोर जावे लागते,याबाबत कार्यवाही आणि अशा घटना कमी होणे नागरिकाना अपेक्षीत आहे"

श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस आधिकारी पद सुमारे ६ महीने रिक्त  परंतु अतिरीक्त कार्यभार रोहा आणि माणगाव यांचेकडे काही काळ होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा