म्हसळा पोलीसानी दोन दिवसात केला चोरीचा तपास.



चोरटया २४ वयाच्या विवाहीत महिलेच्या मुसक्या पोलीसानी आवळल्या.

संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा पोलीस स्टेशनच्या हद्दींत दिवसेंदिवस चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होत असतानाच सोमवार दिं.६रोजी घडलेल्या चोरीची उकल केवळ दोन दिवसांत करून म्हसळा पोलीसानी नागरीकांची शाबासकी मिळवली. म्हसळा शहरानजिक खारगाव (खुर्द) या गावातील मुब्बशीर इकबाल हवालदार यांचे घरांतून दिवसाढवळ चोरीस गेलेल्या सोन्याची रिंग व कान चेन, एक हार, दोन कानातील टॉप असा सुमारे २५ ते २६ हजार किंमती चा ऐवज केवळ दोन दिवसात हस्तगत केल्याची घटना घडली, गुन्ह्याचे ठिकाण आजूबाजूचा परिसर याचा आभ्यास करून  पोलीस उपनिरिक्षक आर.टी. सुर्यवंशी यानी तपासी अंमलदार के.एस.जाधव यांच्या समवेत पो.ना.संतोष चव्हाण, म.पो.शि.वर्षा पाटील यांना तपासाची सूत्रे आणि दिशा दिली, म्हसळा पोलीसानी आपली चक्रे फिरवून २४ वर्षीय  विवाहीत महिलेला तीच्या खारगाव (खुर्द) येथील घरांतून ताब्यात घेतले. महीला पोलीस वर्षाने तीला पोपटा सारखे बोलते करून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा