म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत ४ जागांवरील निवडणूक स्थगित; ४८ पैकी ४० अर्ज वैध | Election Mhasla


म्हसळा नगरपंचायत छाननी नंतर १२ जागांसाठी ४०उमेदवारी अर्ज वैध : मतदान २१ डिसें, मतमोजणी होणार २२ डीसेंबरला

(म्हसळा प्रतिनिधी)

आज म्हसळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी झालेल्या छाननीत १२जागांसाठी४०उमेदवारी अर्ज वैध ठरले, ना.मा. प्रवर्गासाठीआरक्षित असलेल्या प्रभागातील आठ अर्जाची छाननी मा.सुप्रीम कोर्टच्या आदेशाने स्थगित आहे,प्रभाग क्रमांक ४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज मंगेश म्हशीलकर यांचा एकमेव अर्ज आसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने म्हसळा नगरपंचायतीत विजयाचे खाते उघडले.नामनिर्देशन छाननी आणि हरकतींच्या सूनावणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी नगरसेवक पदासाठी असणारे ४०अर्ज वैध ठरविले. म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध सेना काँग्रेस युतीतच खरी लढत होणार आहे.तर भाजप आणि शेकापने सुद्धा उमेदवार देऊन आवाहन दिले आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडणाऱ्या म्हसळा नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी अर्जांची छाननी करून उमेदवारांच्या हरकतींवर निर्णय दिला.सहाय्यक नि.नि.अधिकारी तथा मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी कामकाज पाहण्यासाठी सहकार्य  केले.उर्वरीत १२ जागां पैकी ९जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे.



"पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या असणाऱ्या श्रीमती सरोज मंगेश म्हशीलकर या २००८ मध्ये ग्रामपंचायत सदस्य राहीलेल्या असून त्या प्रभाग क्रमांक ४ मधून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या अनुभवाचा नगरपंचायत कामकाजात मदत होईल"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा