"गरूड झेप स्पर्धा परीक्षा "थेट प्रेक्षपणाला म्हसळयात विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद.



(म्हसळा प्रतिनिधी)
रायगड जिल्हाधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गरूड झेप स्पर्धा परीक्षा ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केंद्राने आयोजित केलेल्या दूरद्दष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाने सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,न्यू इंग्लीश स्कूलचे प्राचार्य प्रभाकर मोरे, महसूल नायब तहसीलदार धर्मराज पाटील,अंजुमन हाय स्कूलच्या प्राध्यापक शहीस्ता मेमन,मंडल आधिकारी तात्यासाहेब उभारे ,तलाठी कैलास पाटील ,गोरख माने उपस्थित होते. पहील्याच सेशनसाठी सुमारे १००ते ११० विद्यार्थी उपस्थित होते, विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती,बहुतांश विद्यार्थी अंजुमन सीनीअर कॉलेजचे होते .यावेळी वाचनालयाचेअध्यक्ष संजय खांबेटे यानी रायगड जिल्हाधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून होत असलेला हा उपक्रम म्हणजे रायगड मधील प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हीसंधी पर्वणी आसल्याचे सांगितले या आभ्यासक्रमासाठी लागणारी बहुतांश पुस्तके वाचनालयात असून आवश्यकते प्रमाणे पुस्तके उपलब्ध करून दिली जातील असे सांगितले.

"स्पर्धा परिक्षार्थना होत असलेले आजचे प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना आभ्यास कसा करायचे आणि आधिकारी कसे बनायचे ह्याचेच ट्रेनींग आहे.आपण विद्यार्थी म्हणून महाराष्ट्रात रहात आसल्याने विद्यार्थ्यांचे माध्यम कोणतेही आसले तरी त्याला मराठीचे पूर्ण ज्ञान असणे महत्वाचे आहेअसे माझे मत आहे"
प्रा.शहीस्ता मेमन, अंजुमन सिनीअर कॉलेज, म्हसळा

" मी प्राची माळी मूळ गांव खरसई, ता म्हसळा आहे. शिक्षण M.A.(Archaeology) पुरातत्व आहे. मी UPSC स्पधी परिक्षेचा आभ्यास करण्याचे ठरवीले, आभ्यासासाठी दिल्लीअगर पुण्याचा पर्याय निवडण्यापेक्षा पर्यावरण पूरक आशा माझ्या गावांतच आभ्यास करण्याचे निश्चित केले. IAS,IPS, IFS तसेच अन्य केंद्रीय सेवा या म्हणजे केवळ नोकरीची व्यवस्था नसून, आपणा सर्वाना देशसेवेची संधी मिळू ठरते. यासाठी आपण सर्वानी आभ्यासाला Target केले पाहीजे पदाला नाही असे मत UPSCची आभ्यासक प्राचीने मांडले ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २जानेवारीत  रोजी  राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्‍या आम्हा विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे.".

या वेळी न्यू इंग्लीश स्कूलचे प्राचार्य प्रभाकर मोरे, योगा तज्ञआभ्यासक डी.आर. सुर्यवंशी सर, तुषार घाटगे, अफीया फकीह यानी मनोगत व्यक्त केले


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा