विज बंद!विज बंद!!उद्या नक्की विज बंद !!!
तातडीच्या दुरूस्तीसाठी म्हसळ्या मधील वीजपुरवठा उद्या बंद
( म्हसळा प्रतिनिधी)
कांदळगांव ते म्हसळा लाईन येथे अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे व नवीन वीज जोडणीचे काम बुधवार दि८/१२ /२०२१ रोजी करण्यात येणार त्यामुळे दि ८ रोजी गोरेगांव विभागांतर्गत म्हसळा तालुक्यातील वीज पुरवठा सकाळी ८:०० ते दुपारी०२:०० वाजे पर्यन्त बंद राहील . कामाच्या गरजेनुसार नियोजित वेळेत पुर्णतः किंवा अंशतः बदल होवू शकतो असेही महावितरणने प्रसीध्दीला दिलेल्या वृत्तांतात म्हटले आहे. तरी ग्राहकांनी कृपया याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे अवाहन कार्यकारी अभियंता म. रा.वि.वि. कंपनी (मर्या) गोरेगाव यानी केले आहे.
Post a Comment