रायगड जिल्हाधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून "गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र "
(म्हसळा प्रतिनिधी)
सार्वजनिक वाचनालय म्हसळा -रायगड या संस्थेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी म्हसळा सार्वजनिक वाचनालयात येत असतात वाचनालयातील स्पर्धा परिक्षा पुस्तकांचा लाभही घेत असतात. जिल्ह्या तील विद्यार्थ्यांसाठी रायगडचेजिल्हाधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवार दि. 4 डिसेंबर 2021 व रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11 वा. "गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 2 जानेवारीत 2021 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे. म्हसळा तालुक्यासाठी समीर घारे तहसीलदार म्हसळा व महसूल नायब तहसीलदार धर्मराज पाटील,मंडल आधिकारी तात्यासाहेब उभारे , तलाठी कैलास पाटील ह्यानी सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे दूरद्दष्यप्रणालीची सुविधा उपलब्ध केली आहे त्या माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 4 डिसेंबर 2021 आणि दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता उपस्थित राहून लाभ घ्यावा असे अवाहन महसुल विभाग व सार्वजनिक वाचनालय म्हसळा यानी केले आहे. शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे विद्यार्थाना मार्गदर्शन मिळणार आहे.
Post a Comment