तळा नगरपंचायतीचा १५ वर्षांचा विकासकामांचा बॅक लॉग भरून काढीन- खा.सुनील तटकरे.



तळा: किशोर पितळे

शहरातील सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत.त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा तळा शहरातील १५ वर्षांचा विकासकामांचा बॅक लॉग भरून काढीन असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.सुनील तटकरे यांनी तळा नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत व्यक्त केला.या प्रचार सभेसाठी खा.सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे, महिला बाल कल्याण सभापती गीता जाधव, राजीप सदस्य बबन चाचले,सभापती अक्षरा कदम उपसभापती गणेश वाघमारे, तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार कार्यकर्ते आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  खास.तटकरे पुढे म्हणाले की आज ग्रामीण भागात असा कुठलाही गाव नाही वाडी नाही जीथे रस्त्यांचे जाळे विणलेले नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तळा शहरासाठी अंबेली येथून पहिली पाणी योजना मंजूर करून आणली शहराचा विकास करायला अक्कल लागते ती अक्कल आणि नियोजन सत्ताधारी शीवसेनेकडे नाही.आज ज्यांना शहर माहीत नाही ते प्रचार करण्यासाठी आले होते अशी टीका उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचे नाव न घेता तटकरे यांनी केली.९ कोटी पाणी योजना मंजूर करण्यासाठी मी अडथळा आणला असा आरोप ज्यांनी केला त्यांनी जलसंपदा खात्याकडून ना हरकत दाखला कोणी आणला याची चौकशी करावी मी जलसंपदा खात्याचा ४ वर्षे मंत्री होतो त्यामुळे ते शक्य झालं. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेस मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आज तत्वतः मान्यता मंजूर करून आणल्यानंतर ती पाणी योजना सत्ताधाऱ्यांनी एक वर्षात का पूर्ण केली नाही श्रीवर्धन नगर पालिकेमध्ये २२ कोटीची पाणी योजना मंजूर करून तिचे काम देखील सुरू करण्यात आले आहे काम करण्याची मानसिकता आणि ताकद मनगटात लागते.   नगरपंचायतीत सत्ताधारी यांच्यात पराकोटीची भांडण आहेत येथे केवळ ठेकेदारी मधून मलिदा खाण्याचे काम सुरू आहे.१२ वाड्यांमध्ये वसलेले हे शहर या शहराचा विकासाचाआराखडा करण्यासाठी कै.दादासाहेब देशमुख असतील कै.अशोक लोखंडे असतील यांनी आपले योगदान दिले त्यासाठी विकासाचा चेहरा लागतो यांच्याकडे कोणता चेहरा आहे? चंद्रकांत रोडे यांनी सभापती म्हणून काम केले आहे. प्रशासकीय अनुभव दांडगा आहे त्यामुळे ते नगरपंचायतीत आमचा विकासाचा चेहरा असतील असे सुनील तटकरे यांनी जाहीर केले  माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या मागे सुनील तटकरे ठामपणे उभा आहे मागच्या वेळी आम्ही कमी पडलो आमची चुकी झाली मी मतदारांची चुकी म्हणणार नाही पण यावेळी फक्त एकदा संधी द्या रोहा माणगाव म्हसळा श्रीवर्धन शहराच्या धर्तीवर तळा शहराचा विकास करण्यात येइल राज्यात १०५ नगरपंचायतीच्यानिवडणुका लागल्याआहेतया१०५नगरपंचायतीमध्येविकास कामांच्या बाबतीत तळा नगरपंचायत पहिल्या पाच नगरपंचायतीमध्ये असेल असे वचन त्यांनी यावेळी दिले सुनील तटकरे जे वचन देतो ते पाळतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यासर्व उमेदवारांनाघड्याळाच्या चिन्हा समोरील  बटण दाबून विजयी करा अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली.     
चंद्रकांत रोडे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवत शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे तळा शहराची वाट लागली असल्याचे सांगितले.स्थानिक पुढारी केवळ ठेकेदारीतून मलिदा कसा मिळत असेल यावर लक्ष ठेऊन आहेत. पाण्याची गंभीर नियोजन असल्याने शहर सोडून लोक दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाली आहेत तळा शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले.शहर प्रमुख महेंद्र कजबजे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा