तळा-किशोर पितळे
तळा नगरपंचायतीची निवडणूक मोठ्या अटी तटीची होणार असून सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार ऐन रंगात आला आहे.प्रचार रँलीला जोर आला आहे. १७वार्डातुन मतदारांच्या भेटी गाठीला उमेदवार प्रत्येक घरा घरात जावून मताची झोळी पुढे करीत आहेत. यावेळीशिवसेना,राष्ट्रवादी,भाजप, शेकाप,बहूजनवंचीत आघाडी मनसे सर्वच रिंगणात उतरले आसून काही जणआपले नशीब आजमावून पहाणार आहेत.खरी लढत राष्ट्रवादी×शिवसेना×भाजप अशीच होणार असून शिवसेना सर्व ताकदीने बहुमताने विजयी होण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदारांपर्यत पोहोचण्यात अव्वल स्थानी आहे.प्रत्येक वार्डातुन उत्तम प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.गेल्या दोन वर्षात विकास कामात घेतलेलीभरारी, कै. बाळशेट लोखंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे.पहिल्या दोन ते तीन वर्ष कायम स्वरूपी मुख्याधिकारी न मिळाल्याने विकास कामाची मोट बांधता आली नाही.त्यामुळे ग्रामपंचायत होती ती बरी होती असा नागरीकांंचा सूर होताच यानंतर मुख्याधिकारी लाभल्यामुळे विकास कामाचा सपाटा लावला. सतत भेडसावणाऱ्या पाणी पुरवठा समस्या, वीज,रस्ते, अंतर्गत रस्ता,भूमीगत गटारे, वाढत्या लोकसंख्या वाढीचा विचार करता नियोजीत वाढीव पाणी योजना वावे धरणाचे लवकरच मार्गी लागणार आहे. अशी विविधविकास कामेशिवसेने कडून करण्यात आलीआहेत. कोट्यवधी रू. निधी उपलब्ध करून विकास केलाआहे.हि सत्ताधारी पक्षाची जमेची बाजू आहे.शहराच्या उपेक्षित विकास केला जाईल अशी आश्वासन दिले जात आहे.त्यामुळे मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी सांगितले.जनतेच्या मनातील विकास करण्याचा आपला मानस आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यावरभर दिला जाईल असे सांगितले. शिवसेनेच्या सर्व जागा विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आम भरतशेठ गोगावले माजी आ.अवधूत तटकरेयांनीशिवसेनाउमेदवारांसाठी प्रचारात सहभागी झाले. भरतशेठ गोगावले यांनी तळा शहरातील विकासकामे करण्यासाठी खूप सहकार्य लाभले त्यांच्याच प्रयत्नांनी तळा शहरासाठी तब्बल ९ कोटी रुपये खर्चून पाणी योजना राबविण्यात येणार आहे. माजी आ.अवधूत तटकरे यांनी तळा नगरपंचायत निवडणूक प्रचारात उडी घेतल्याने तटकरे विरुद्ध तटकरे असा सामना रंगताना पहायला मिळणार आहे.राष्ट्रवादीकाँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची सुमार कामगिरी यामुळे खासदार पालकमंत्री आणि आमदार यांना तळ्यात तळ ठोकून रहावे लागत आहे हे सर्वसामान्य जनतेला कळले असून जनता शिवसेनेच्या उमेदवारांच्यापाठीशी आहे असा विश्वास तालुका प्रमुख प्रधुम्न ठसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment