माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुलेचे आणि बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हसळा करानी काँग्रेस-शिवसेना आघाडीला मतदान करा : सुभाष देसाई



(म्हसळा -प्रतिनिधी)
म्हसळा गावाची मागास नव्हेतर विकसित गाव अशी ओळख होण्यासाठी नगर पंचायत निवडणुकीत म्हसळेकरांनी साथ द्या,मदत करा आणि सेना काँग्रेस युतीच्या उमेदवारांना नगर पंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा.पाच वर्षे ज्यांनी वचन देऊन काही केलं नाही तशी पाळी आम्ही तुमच्यावर येवु देणार नाही असा टोला महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी म्हसळा येथे सेना काँग्रेस युतीच्या उमेदवारांचा प्रचार सभेत विरोधीपक्ष नेत्यांचे नाव न घेता लगावला ते पुढे बोलताना म्हसळा तालुक्यात पाणी आणि आरोग्य सेवेच्या आणि अन्य विकासकामांसाठी निधीची कमतरता पडु देणार नाही.निवडून आल्या नंतर तुमच्या पाठीमागे राज्यशासना ची,मंत्रालयाची पुर्ण ताकत देण्याचे वचन देतो असे ना. देसाई यांनी सांगताना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र राज्य समृद्ध करण्याचे अधुरे स्वप्न आम्ही पुर्ण करणार आहोत.बॅरिस्टर ए.आर.अंतुले हे बाळासाहेबांचे आवडते मुख्यमंत्री होते त्या काळात साहेबानी अंतुले यांना पाठींबा,प्रोत्साहन दिले, आगेबडो सांगितले आणि त्यांना सर्व तर्हेचे सहकार्य केले त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे आहेत म्हणुन सेना काँगेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येवुन म्हसळयाचा कायापालट करायचा आहे,बदल घडवण्या साठी निश्चय व पण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी युतीच्या कार्यकर्त्या ना दिले.म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सेना युतीच्या  उमेदवारांच्या आयोजित प्रचार सभेत ना.सुभाष देसाई यांच्या समावेत माजी आमदार तुकाराम सुर्वे,जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,उप जिल्हा प्रमुख शामकांत भोकरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,सेना नेते डॉ.कामेरकर, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुविज शेख,माजी सभापती महादेव पाटील,माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,रविंद्र लाड,बाबाजान पठाण,रफिक घरटकर,रविंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.सभेत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात माझ्याकडे उद्योग खाते आसुन रायगड जिल्ह्यात अनेक उद्योग यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत.महाराष्ट्र राज्य उद्योगासाठी एक नंबरचा राज्य आहे येथे सर्वसेवा सुविधा उपलब्ध आहेत येथे उद्योग यावेत याकरिता आम्ही दुबई एक्स्पोर्ट असलेल्या जागतिक मेळाव्यात जाऊन जगातील मोठया उद्योगा़ंना निमंत्रित केले आहे.जगातील 12 कंपन्यांनी करार केला आहे.माणगाव येथे औद्योगिक पट्टा विकसित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण काम पुर्ण झाले आहे आता तेथे लवकरच काम सुरू होऊन उद्योग आणि एमआयडीसी निर्माण होईल आणि घराघरात असलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल त्या साठी राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी निवडणूक प्रचार कार्यक्रमात व्यक्त केले.विकासासाठी मा.उद्धवजी ठाकरे निधीची कमतरता पडु देणार नाहीत असे आश्वाशीत करताना शिवसेना काँग्रेसचे उमेदवार भरघोस मतांनी निवडुन येवोत अशा शुभेच्छा दिल्या. युतीचे उमेदवार निवडून येताच त्यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. म्हसळा शहरात आरोग्य,पाण्या बाबतीत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कंबर कसून  मेहनत करावी आवश्यक लागणारी मदत आम्ही पुरवू, शासनाकडू निधीची मंजुरी करण्यासाठीची जबाबदारी आमची असेल असे सांगताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपलेच आहेत त्या साठी आम्ही वचनबद्ध  असल्याचे सांगताना कोरोना सारख्या कठीण काळात पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले.देशात ऑक्सिजनची कमतरता असतांना महाराष्ट्र राज्यात एकही रुग्ण ऑक्सिजनविना मरू दिला नाही,कोरोनावर यशस्वीपणे मात करून राज्य अनलॉक केले त्यांचे याच कामाचे who ने कौतुक केले तर देशभरातील अन्य राज्य शासनाचे मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्याचा कित्ता गिरविण्यासाठी अभ्यास केल्याचे ना.सुभाष देसाई यांनी शेवटी सांगितले.प्रचार सभेत सेनेच्या तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष पदी शौकत हजवाने यांना नामदार देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले तर प्रसाद बोर्ले यांना पक्षप्रवेश देवुन शिवबंधन बांधले.
"सेना काँग्रेसच्या व शिवसेनेच्या सर्वच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांचेवर खरमरीत टिका केली मात्र शिवसेना नेते ना.सुभाष देसाई ह्यानी तटकरे परिवाराचे विरोधात कोणतेही भाष्य केले नाही त्या उलट आघाडी सरकारच्या आणि पक्ष प्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहवासात काम करण्या ची संधी मिळाली त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा