जिल्ह्यातील नगरपंचायती च्या निवडणुकांसाठी आमदार भास्कर शेठ जाधव यानी प्रचार दौरे करावे शिवसैनिकां ची मागणी

म्हसळा,माणगाव,तळा या नगर पंचायती च्या निवडणुकांसाठी आमदार भास्कर शेठ जाधव यानी प्रचार दौरे करावे शिवसैनिकां ची मागणी
(म्हसळा प्रतिनिधी) 
दाक्षिण रायगड मधील श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा,माणगाव,तळा,पोलाद पूर नगरपंचायतीं मध्ये नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्य सरकार मधील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा अद्यापही आघाडीबाबत निर्णय झाला नसल्याने,पक्षसंघटनेत वाढ महच्वाची ह्या मुख्य हेतूने सर्व घटक पक्षांनी आपापल्या तालुक्यातून मोर्चे बांधणीला सुरवात केल्याचे चित्र आहे.म्हसळा नगर पंचायती मध्ये सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.तळा नगरपंचायती मध्ये सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.माणगाव व पोलादपूर मध्ये सुध्दा बहुतांश पक्ष एकमेकांच्या विरुद्ध ठाकणार आहेत. म्हसळा,माणगाव,तळा या नगर पंचायती तील शिवसैनिकांच्या वतीने म्हसळा तालुक्याचे शिवसेना सहसंपर्क अनिल काप यानी गुहागरचे शिवसेनेचे आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांनी प्रत्येक तालुक्यातून प्रचार सभा घ्यावाअशी आग्रही मागणी लावून धरल्याचे काप यानी सांगितले ,म्हसळा तालुक्याचे मा.तालुका प्रमुख नंदू शिर्के यानी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत,पंचायत समिती ,जिल्हा परिषद,निवडणुकी दरम्यान माजी खासदार अनंत गिते, आणि पक्षाचे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी जर रायगड जिल्ह्याचा दौरा केला तर त्याचा फायदा शिवसेनेला होईल असे बहुतांश शिवसैनिकांचे मत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा