म्हसळा नगरपंचायतीतील ४९७८ मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार, निवडणुक यंत्रणा सज्ज ,चोख पोलिस बंदोबस्त, शहरातून पोलीस संचलन…!


म्हसळा नगरपंचायतीतील 
४९७८ मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार, 
निवडणुक यंत्रणा सज्ज ,चोख पोलिस बंदोबस्त, शहरातून पोलीस संचलन…! 

म्हसळा दि.२० डिसेंबर 

म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकिसाठी १२ मतदान केंद्रावरती स्थानिक पोलीस स्टेशनचे सपोनी उध्दव सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली ५पोलिस अधिकारी व ५३ कर्मचारी,३० अधिकारी कर्मचारी असलेले एक दंगल नियंत्रण पथक, आणि २१होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत तर स्थानिक पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रं.२,७,८, ९ या चार ठीकाणची उमेदवारी ना.मा.प्र.असल्याने निवडणुक स्थगित आहे.तर प्रभाग क्रं.चार मधील आरक्षीत(अनु.जाती महिला) येथील निवडणूक बिन विरोध झाल्याने.४९७८ मतदार आज मतदानाचा हक्क बजाव णार आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकिसाठी संपुर्ण निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणुक कर्मचा-यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे.१२ मतदान केंद्रावरती कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावरती मतपेटया व कर्मचारी रवाना करण्यात आल्या आहेत. १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत.स्पर्धेतील उमेदवारांमध्ये भाजपा ८, राष्ट्रवादी कॉंग्रेस ८,शिवसेना ५,काँग्रेस ३,शेकापक्ष २,अपक्ष २ उमेदवार आपले नशीब केवळ ४९७८ मतदारांकडून जाणून घेणार आहेत.त्यामध्ये महीला उमेदवार१०, पती- पत्नी (जोडपी) २ आपले नशीब आजमावणार आहेत.
  मतदान प्रकियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शासन सज्ज आहे, १२ मतदान केंद्रासाठी ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास मतदान यंत्रे म्हसळा नगरपंचा यतीच्या निवडणुकिसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. सर्व मतदान यंत्राची तपासणी करुन ती सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अपंगांना मतदान करता यावे यासाठी रँम्प असल्याची खात्री करण्यात आली आहे.निवडणु कीसाठी नियुक्त केलेले सर्व कर्मचारी हे नगरपंचायतक्षेत्रा बाहेरील असल्याने त्यांचा मतदानाचा प्रश्न येत नाही.मात्र अत्यावश्यक सेवांसाठी नगरपं चायत क्षेत्रा तील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कर्मचा-यांना मतदान करण्या पुरती मोकळीक देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा