तळा नगरपंचायतीच्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : ७३.८२% मतदान



निकालाची १९जानेवारी पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार.
तळा (किशोर पितळे)तळा नगरपंचायतीच्या निवडणूकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.राज्यातील १०५नगरपंचायतीच्या निवडणुका आज २१डिसेंबर२१रोजी होत असून रायगडातील सहा नगरपंचायती पैकी पाली सुधागड नव निर्मिती झाली आहे.तळा माणगांव, पोलादपूर, खालापूर म्हसळा या नगरपंचायतीच्या दुसरुंदा होत आहेत.तळा नगरपंचायत हि शिवसेना पक्षाकडे आहे एकूण मतदार ५९२९असून स्त्री मतदार २९१९ व पुरूष ३०१० मतदार आहेत १७ प्रभागापैकी १२ प्रभागात 
निवडणूक होत आहे. शिवसेना११ राष्ट्रवादी ९भाजप ४ शेकाप २ मनसे ३ बहुजन वंचित आघाडी १ बहुजन समाजपार्टी १ अपक्ष ५ पैकी १ बिनविरोध विजयी असे 
एकूण ३६ उमेदवार उभे असून खरी लढत ही शिवसेना × राष्ट्रवादी ×भाजप यांच्यात होणार आहे. उमेदवार आपले नशीब आजमावणार असून या सर्व ३५ उमेदवारांचे भवितव्य आज बंद पेटीत बंद झाले.असून ७३.८२% मतदान झाले आहे यंदा टक्केवारी वाढली आहे.दरम्यानउपविभागीय पोलीस अधिक्षक महाड श्री तांबे तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेची पहाणी केलीया काळात कोणताही अनुचित प्रकार घडला असून पोलीस यंत्रणा,राखीव पोलीस, होमगार्ड तैनात ठेवण्यात आले होते.मतदान शांतता सुव्यवस्थेत सुरळीतपणे पार पडले असून निकालाची वाट पहावीलागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा