तळा :किशोर पितळे:तळा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरात चांगलाच वेग आलाआहे. या प्रभागात अनुभवी उमेदवार माजी नगरसेविका नेहा नमीतपांढरकामे या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत.या प्रभागात रिंगणात पहिल्यांदाच उतरलेली दिव्या दिलिप वडके नवख्या असून निवडणुकीला सामोरे जात आहेत.निवडणूक चुरशीची होत असुन नेहा पांढरकामे नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून पाच वर्षे सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या आहेत. उच्चशिक्षीत, कार्यतत्पर,सुसंस्कृतअसून पाणीपुरवठा, मलनिसाःरण, दिवाबत्ती, बांधकाम सभापतीपदी समाजसेवा केली आहे.प्रभाग ६ शेळके आळी,कासारआळी बाजारपेठ उत्तरे कडील भाग राधाकृष्ण मंदिरपरिसरअसा असून सर्व सुशिक्षित मतदार आहेत मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल पाडळकर यांचा पराभव केला होता. यावेळी खरी लढत शिवसेना × राष्ट्रवादी यांच्यात आहे.दोन्ही पक्षाकडून प्रचाराला जोरदार सुरू आहे. या प्रभागात शिवसेनेचे पारडे जड आहे. परंतु मतदानाचे वेळी कितपत साथ मिळेल. याबाबत संभ्रमावस्था आहे. राष्ट्रवादी कडून खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, घरोघरी मतदार भेटी घेऊन प्रचार करून यावेळी आम्हाला संधी द्या.अशी मताची झोळी पुढे करीतआहेत.मात्र शिवसेनेकडून स्थानिक कार्यकर्त्यानी कंबर कसली असुन मतदारांच्या भेटी घेऊन पाच वर्षांत घडवून आणलेला विकासाची वचन पूर्ती व वचन नामा तसेच अपेक्षित विकास केला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.तुर्तास दोन्ही पक्ष विजयाचा दावा करीत असले तरी सुज्ञ मतदार हे सुयोग्य उमेदवाराला स्विकारतील कि नवख्याउमेदवाराला स्विकारतील. हे काळच ठरवेल या राजकीय पेचात मतदारांनी कोणाला स्विकारले हे १९जानेवारी२२ रोजीच समजणार आहे.तो पर्यत मतदार उमेदवार यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
तळ्याच्या प्रभाग ६ मध्ये दुरंगीलढत ; शिवसेना वि. राष्ट्रवादी मध्ये सामना : मतदार कोणाला स्वीकारणार.?
Admin Team
0
Post a Comment