शिवसेनेचे माजी आमदार श्याम सावंत म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपासाठी सक्रीय भाजपाचे उमेदवारां साठी जाहीर सभा व प्रचार रॅली



(म्हसळा प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी च्या म्हसळा नगरपंचायच्या अधिकृत उमेदवारांची जाहीरसभा श्रीधावीर मंदीराचे पटांगणात व प्रभाग क्रमांक १४ व १५ मध्ये प्रचार रॅली काढण्यातआली यावेळी श्रीवर्धनचे माजी आमदार शामभाई सावंत,प्रदेश भाजपा चिटणीस रवी मुंढे, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य कृष्णा कोबनाक,श्रीवर्धन तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत शिंदे , नाना महाले,भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील,आणि ८ प्रभागातील उमेदवार आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आमदार शामभाई सावंत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला.पूर्वी देशाचे पंतप्रधान व अन्य नेते मुंबईत आल्यावर शिवसेना संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरेना भेटण्याकरिता  मातोश्रीवर जायचं परंतु आता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनले, आणि शिवसेना प्रवक्ते राऊत, आणि मंत्री अन्य राज्याचे मंत्र्याना भेटायला हॉटेलवर जातात अशी जहरीली टीका सावंत यांनी केली. कृष्णा कोबनाक म्हणाले की, मागील 10-12 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार,खासदार,पालकमंत्री, विधान परिषद सदस्य एकाच कुटुंबातील असून देखील म्हसळा शहराचा विकास झाला नाही.म्हसळा मध्ये महिलांसाठी मध्यवर्ती असे साधे शौचालय देखील बांधता येत नाही.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबानी सत्ता नसताना देखील माणगांव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग केला परंतु म्हसळ्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना म्हसळा शहरातील  ऐतिहासिक बाजारपेठ सुशोभित करता आली नाही, म्हसळा तालुका ज्या प्रशासकीय यंत्रणेवर चालते त्या यंत्रणेकरिता असलेली प्रशासकीय इमारत बांधता आली नाही.एवढी वर्ष त्यांना सत्ता दिली आता  आम्हाला सत्ता द्या.आम्ही म्हसळा शहराचा विकास करू. मोदी साहेबांनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास या धोरणाला सामोरे ठेवून शहराचा नंतर तालुक्याचा विकास करू आम्हाला संधी द्या असे म्हणत कमळाच्या बटनावर दाबून भाजपाला आपले बहुमुल्य मत द्या असे म्हसळा कराना जाहीर आवाहन केले.

फोटो. माजी आमदार शामभाई सावंत यांचा सत्कार करताना शहर भाजपा तालुकाअध्यक्ष रायकर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा