बाबू शिर्के : म्हसळा
राज्य निवडणूक आयोगाने तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २१ डिसेंबरला मतदान, तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.म्हसळा तालुक्यातील एकूण 11 ग्रामपंचायत मधील 19 जागी पोटनिवडणुक होणार आहे.उमेदवारी अर्ज ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत सादर करता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी ७ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी २२डिसेंबर ला होणार आहे.ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात कुडगाव ग्रामपंचायत साठी टेबल क्र 1 हेमंत माळी, रेवळी आणी खरसई ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 2 मंगेश गणपत साळी, ठाकरोली ग्रामपंचायतसाठि टेबल क्र 3 सुनिल गायकवाड, चिखलप आणी देवघर ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 4 अशोक गणपत बाक्कर, मेंदडी, तुरुंबाडी ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 5 चंद्रसेन चौधरी,कणघर ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 6 एच एम परकाळे, फळसप ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 7 एस एन कुसाळकर, जांभूळ ग्रामपंचायतसाठी टेबल क्र 8 बी पी कदम यांची नियुक्ती केली आहे.
Post a Comment