दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला तोंडसुरे जवळ अपघात : महीला गंभीर जखमी



संजय खांबेटे : म्हसळा
दिघी पोर्ट' ते जळगाव  या नव्याने होणाऱ्या ७५३ एफ' या राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित म्हसळा बायपास्ट (तोंडसुरे) जवळ दुचाकीचा अपघात होऊन अपघातात ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ५.३० वा. घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वारळ येथील ऋतीक पांडुरंग चाळके वय २१ रा.वारळ हा आपले जवळील MH02 CK8944 या पल्सर मोटर सायकलने वारळ हून म्हसळा शहराकडे येत असता तोंडसुरे गावा जवळ (नियोजित म्हसळा बायपास्ट)आला असता दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन दुचाकी वरील श्रीमती रेश्मा पांडुरंग चाळके वय ४१ (दुचाकी चालकाची आई) या दुचाकीवरून पडून  गंभीर जखमी होवून मान, डोक्याला गांभीर दुखापती व रक्तस्त्राव झाल्याने  ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे भरती केले. अपघाताचे स्वरूप पाहून  डॉ.सोनाली जुन्नरकर यानी जखमी महीलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे समजते. 

" दुचाकीस्वार ऋतीक यानी अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे म्हसळा पोलीसाना ग्रामिण रुग्णालयात लिहून दिल्याचे ठाणे अमलदार किशोर जाधव यानी सांगितले" 

फोटो. अपघात गांभीर दुखापती झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी १०८ने नेत असता म्हसळा पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार किशोर जाधव व अन्य कर्मचारी व शेजारीच उभी असलेली पल्सर मोटर सायकल छाया चित्रांत दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा