म्हसळा नगरपंचायतीवर काँग्रेसचा विजय हीच खरी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेना श्रध्दांजली


म्हसळा नगरपंचायतीवर काँग्रेसचा विजय हीच खरी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेना श्रध्दांजली व रायगडची काँग्रेसची विजयाची नांदी ठरणार.

संजय खांबेटे : म्हसळा 
रायगड जिल्हयातील काँग्रेसची मरगळीना स्थानिकाना आम्ही जबाबदार धरणार नाही कमी जास्त चुका आमच्या कडूनच घडल्या ची स्पष्ट कबुली देत म्हसळयातील कॉंग्रेस कार्यकर्तांची  मने जिंकत म्हसळयात कॅबीने ट मंत्री विजय वडेट्टीवार यानी देशातील काँग्रेस विरोधक, केंद्रातील सत्ताधारी भाजपावर घणाघाती टिका करत आता म्हसळाकर मतदार झालेली चूक सुधारून म्हसळा नगरपंचायतीवर कॉंग्रेसची एक हाती सत्ता आणतील हीच खरी माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुलेना खऱ्या अर्थाने श्रध्दां जली ठरेल व भविष्यातील रायगड जिल्हा  काँग्रेसची विजयाची नांदी ठरणार आसल्या चे भावनिक आवाहन कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार यानी म्हसळ्यातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला अध्यक्षा श्रध्दा ठाकूर,रायगड जिल्हा निरीक्षक चारू लता टोकस,प्रदेश कमिटी सरचिटणीस चंद्रकांत पाटील,मंदा म्हात्रे,हनुमंत जगताप, रायगड जिल्हा सह प्रभारी श्रीरंग बरगे, श्रेयश जगताप, म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ.मोईज शेख,तालुका सचिव रवी दळवी, रफी घरतकर,शहर अध्यक्ष बाबा हुर्जूक, धनंजय देशमुख,बाबजान पठाण, सुफीयान पठाण व अन्य उपस्थित होते. म्हसळा तालुका काँग्रेसचे तरुण तडफदार अध्यक्ष डॉ.मोईज शेख यांची नजर आणि आभ्यासाचा अंदाज मला आता समजला असून यापुढे म्हसळा तालुक्याला निधीची मी  कमतरता कमी पडून देणार नाही अशी ग्वाही मंत्री विजय वडेट्टीवार यानी उपस्थि तांना दिली. तालुका अध्यक्ष डॉ.मोईज शेख यांच्या समवेत राज्य संघटना असेल असेही मंत्री महोदयानी सांगितले,राज्यातील शेतकरी,विद्यार्थी,महिलाना असणाऱ्या बहुतांश सबसीडी व अन्य सवलती या माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले आणि काँग्रेस सरकारने सुरु केल्या आहेत.भाजपा केवळ भुलथापा देत आहे .राज्यांत महा विकास आघाडी असलीतरी आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला आपली संघटना मजबूत करण्याचा हक्क आहे यापुढे आम्ही म्हसळ्यातील काँग्रेसकडे  विशेष लक्ष केंद्रीत करणार आसल्याचे आश्वासन मंत्री वडेट्टीवार यानी दिले.

" तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था बाबतbनगरपंचायत निवडणुकी बाबत आघाडी-युती धोरणाची उपस्थित मंत्री व मान्यवरानी कोणतेही स्पष्ट संकेत न दिल्याने तसेच काँग्रेसचे स्थानिक विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेस वर कोणतीही टिका- टिपणी न केल्याने उपास्थित कॉंग्रेस निष्ठावंत थोडया बहुत प्रमाणात नाराज झाल्याची चर्चा होती"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा