तळा: किशोर पितळे
नामदेव शिंपी समाजाचे श्री राधाकृष्ण मंदिरात गेली ११८वर्षे आश्विन पौर्णिमा (कोजागिरी)ते त्रिपुरारी पौर्णिमा असा एक महीना काकड आरती सोहळा साजरा केला जात असून कार्तिकी एकादशीला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५१वा जन्मोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.या सोहळ्याची समाप्ती आज १९नोव्हे.२१रोजी करण्यात आली. या मंगलमय सोहळा अनेक भाविकांची मांदियाळी ठरते.
अबाला पासूनवृध्दापर्यत पर्वणीचअसते काकडआरती सकाळी ५.३० ते ७.३०पर्यंत होते.त्रिपुरारीपौर्णिमेला तुलशी विवाह,काकड आरती समाप्ती, दुपारीमहाप्रसाद रात्री१०वा. शेजारती अशा पध्दतीने हा सोहळ्याचे नियोजनसंस्थेचे अध्यक्ष कार्यकारी मंडळ करीत असते. दररोज समाज बांधवांना पुजा सेवेचा मान दिला जातो.
या सोहळ्यात कासार सोनार, वाणी,कुंभारसर्वचभाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहूनसहभागी होतात.मुर्तीना वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे चढवली जातात. त्यामुळे मनमोहक रुप पहायला मिळते.पावित्रता सामाजिक बंधूभाव एकात्मतेचे दर्शन पहायला मिळते.संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कजबजे,सचिव नमीत पांढरकामे श्रीराम कजबजे सालकरी व्यवस्थापक नितीन मुद्राळे समाज बांधव यांच्या नेतृत्वाखाली या मंगलमय धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.
Post a Comment