प्रधानमंत्री पीक विमा योजनें अंतर्गत कोकणाततील आंबा पिकाला राज्य शासनाचा सपत्नीक न्याय : एकाच कोकणातील पाच जिल्ह्याना वेगवेगळे दर.
दर कमी करण्याची आंबा उत्पादक संघाची मागणी.
संजय खांबेटे : म्हसळा
बदलत्या हवामानामुळे कोकणचा हापूस संवेदनशील बनत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा आंबा व काजू या फळपिकासाठी शासनाने लागू केली आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत शासनाने निश्चित केली आहे, परंतु आंबा पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम रु ७० (प्रति आंबा कलम ) वरून विमा कंपन्यानी रु २९४ (प्रति कलम )केली आहे ती तात्काळ रु ७० करावी अशी मागणी रायगड जिल्ह्यातून आंबा बागायतदारां कडून व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादकसंघा कडून राज्य शासनाचे कृषी व फलोत्पादन मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.राज्यांत आंबा पिक सर्वसाधा रण पणे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड,पालघर व ठाणे जिल्ह्यांतून घेतले जाते,शासन प्रणालीत सुध्दा संपूर्ण कोकण विभाग एकच असताना, पिक सुध्दा एकच आंबा असताना पिक विमा हप्त्याची रक्कम प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र का?असाही सवाल आंबा बागायतदाराना पडला आहे. मागील वर्षी आंबा पिकासाठी विमा हप्त्याची सक्कम रु ७० (प्रति आंबा कलम ) वरून विमा कंपन्यानी ती चौपट वाढवून आता रु२९४ केली आहे.ती रद्द करून पूर्ववत करावी अशी मागणी चंद्रकांत मोकल अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यानी, तसेच रायगड जिल्ह्यांतील श्रीवर्धन, म्हसळा तालुक्या तील तसेच पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील कोंडीराम चोरधे,विजय भगत,संदीप पाटील व अन्य शेतकऱ्यानी केली आहे.
हवामान आधारित फळपिका विमा योजना व कोकणातील विविध जिल्ह्यातून आंबा पिक विमेसाठी आकारण्यात येणारा दर रत्नागिरी कंपनी रिलायन्स रु १३३ प्रति झाड(आंबा कलम) सिंधुदूर्ग कंपनी रिलायन्स रु ७० प्रति झाड (आंबा कलम) रायगड भारतीय कृषि विमा कंपनी रु२९४ प्रति झाड(आंबा कलम) पालघर कंपनी रिलायन्स रु२०३ प्रति झाड(आंबा कलम) ठाणे HDFC ERGO रु२१७ प्रति झाड(आंबा कलम) नैसगिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पत पुरवठ्यात सातत्य राखणे आणि उत्पादनातील जोखमीपासून संरक्षण ही विमा योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.गतवर्षी वाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीपोटी विमा संरक्षण देण्यात आले होते; मात्र यंदा तो निकष रद्द का केला? वास्तविक पहाता कोकणा तील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर व ठाणे हे पाचही जिल्हे अरबी समुद्राचे लगतचे जिल्हे असून अरबी समुद्रात हल्ली सतत कमी दाबाचे पट्टे तयार होत असताना च वाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीपोटी विमा संरक्षण न देणे हे बागायतदारांचे हितावह नसल्याचे व पिक विमा संरक्षण या मुख्य उद्देशाला बगल देणारे आहे असे मत पुढे येत आहे. यासाठी शासनाने भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड या कंपनीची प्राधान्याने नियुक्ती केली आहे. तीच कंपनी अन्य विमा कंपन्यांपेक्षा जास्त दर का घेते व कोकणातील पाचही जिल्ह्यांतून हवामान सारखे असताना पिकविमेसाठी वेगवेगळे दर का?या प्रश्नावर कोकणा तील शेतकरी संघटीत होण्याच्या पवित्र्यात आहेत.
Post a Comment