संत निरंकारी मंडळ चोरवली तळा यांच्या वतीने रक्त दान शिबिर संपन्न : रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद.




तळा: किशोर पितळे
संत निरंकारी मंडळ (Sant Nirankari Mission ) चोरवली तळा बिट क्र.४०(अ)यांनी आज ३१ आँक्टो रोजी रक्तदान शिबीर तळा कुणबी समाज भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच रक्तदात्यांनी गर्दी केली होती.या कार्यक्रमाला नगरपंचायतीचे नगरसेवक च़ंद्रकांत रोडे, भाजप प्रदेश सचिव रविंद्र मुंढे पं.स.अक्षरा कदम कुणबी युवा अध्यक्ष सचिन कदम प. आ. महात्मा प्रवीण पाटिल जी ( क्षेत्रीय संचालक रायगड क्षेत्र) प. आ. महात्मा प्रकाश म्हात्रे जी ( रायगड झोन ४० अ झोनल प्रमुख ) उपस्थित होते व अधिकारी संत निरंकारी मंडळ चोरवलीचे मुखी गणेश राणे यांच्याप्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक,वैद्यकीय उपक्रम राबवून संत निरंकारीमंडळ सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून करीत असते मग आपदग्रस्तांनामदतीसाठी सरसावून एक मायेचा हात दिला जातो. याचाच एक भाग म्हणून रक्त संकलन करून राज्य रक्त संक्रमण शासकिय रक्तपेढी अलिबाग जि. रायगड पाठवून शासनाला या माध्यमातून सहकार्याचा हात पुढे केला आहे या संकलीत केलेल्या रक्ताचा उपयोग गरजूंना उपयोगी पडून त्या पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे.मा.रवीभाऊ मुंढे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की संत निरंकारी मिशनचे कार्य कौतुकास्पद आहे,आज निरंकारी मिशन माणसाला देव दाखवण्याचे कार्य करत आहे,रक्तदान हे मोलाचे कार्य आहे रक्तदान प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे वेगवेगळे उपक्रम संत निरंकारी मिशन करीत आहे, तर चंद्रकांत रोडे म्हणाले रक्तदाना बरोबर नेत्र दान सुद्धा करणे गरजेचे आहे,तसेच माणसाला एकत्र ठेवण्याचे व सेवा भावनेचे कार्य निरंकारी मिशनच्या माध्यमातून होत आहे, जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉ दीपक गोसावी म्हणाले की कोरोनामुळे रक्ताचा साठा खुप कमी पडत आहे. संत निरंकारी मिशन रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन सहकार्य केले आहे तसेच ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी कोरोना बरा झाल्या नंतर एक महिन्याने रक्तदान करु शकतात,तसेच ज्यांचे एक किंवा दोन डोस झाले आहेत त्याने डोस घेतल्या नंतर चौदा दिवसाने रक्तदान करु शकताअसे मार्गदर्शन केले. रायगड झोन ४० अ  झोनल प्रमुख प.आ.महात्मा प्रकाश म्हात्रे जी म्हणाले की संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमा मध्ये कौतुकास्पद कामगिरी आहे,त्याच बरोबर रायगड झोन मध्ये या वर्षी ७०० रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी
नामदेवकाप (कुणबी समाज तळा तालुका अध्यक्ष), प.आ.महात्मा दयाल पारधी जी, प.आ.महात्मा राम टेंबे जी, प.आ.महात्मा शंकर सारंगे जी, प.आ.महात्मा सकपाल सर ,प.आ.महात्मा साबले जी,प.आ.महात्मा शांताराम नटे सेवादल यूनिट नंबर ८३८ व सेवादल अधिकारी यांचे मोलाचेसहकार्य लाभलेसर्वरक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र देऊन प.आ.महात्मा गणेश राणेजी मुखी चोरवली ब्रांच यांनी सर्वांचेआभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा