खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देणे आवश्यक- सुनील तटकरे




म्हसळा प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार मा.श्री.सुनीलजी तटकरे साहेब यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल म्हसळा श्रीवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी पदाधिकारी यांनी सुतारवाडी येथे सदिच्छा भेट घेतली.त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद भायदे,कार्याध्यक्ष गणेश पाटील उपाध्यक्ष आदेश विरकुड,रमेश घरत सल्लागार रत्नाकर पाटील,वीरेंद्र वाणी,जयवंत कांबळे,नवनाथ नाक्ती,भालचंद्र नाक्ती योगेश धुमाळ आदि पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी बोलताना तटकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी आणि या खेळावर प्रेम करणारे आपण सर्व खेळाडू आहोंत खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या क्रीडा गुणांना वाव मिळणे आवश्यक आहे  अगोदर माझे अनेक सत्कार झाले मात्र महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रथम सत्कार हा माझ्या म्हसळा श्रीवर्धन तालुका कबड्डी असोसिएशनने केला आहे.म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात क्रीडा क्षेत्रात गुणवंत खेळाडू पाहायला मिळतात मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे प्रगती करता आली नाही मात्र या असोसिएशनच्या माध्यमातून या खेळाडूना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत आहे.या पुढे आपल्या तालुक्यातील खेळाडू जिल्हा, राज्य स्तरावर भरारी घेण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य होईल ते करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे हि त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष गणेश पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा